भामरागड अभयारण्य

महाराष्ट्राच्या चंद्रपूर जिल्ह्यातील घनदाट जंगलाच्या कुशीत वसलेले भामरागड वन्यजीव अभयारण्य! हे निसर्गप्रेमी आणि साहस प्रेमींसाठी एक अद्भुत ठिकाण आहे. १०४.३८ चौरस किलोमीटर क्षेत्रफळात पसरलेले हे अभयारण्य हिरवाईने नटलेले असून, विविध प्रकारच्या वनस्पती आणि प्राण्यांनी समृद्ध आहे. येथे प्रवास करताना पामलगौतम आणि परलकोटा नद्यांच्या शांत लहरी सोबत वाहतात. जर तुम्हाला रोजच्या धकाधकीच्या जीवनातून दूर जाऊन निसर्गाच्या सान्निध्यात रममाण व्हायचे असेल, तर भामरागड अभयारण्य तुमच्यासाठी सर्वोत्तम ठिकाण ठरते!

भौगोलिक वैशिष्ट्ये

हे अभयारण्य पानगळीच्या जंगलांनी आच्छादलेले आहे. दाट झाडांमध्ये वसलेले लहान पठार आणि विस्तीर्ण गवताळ भाग त्यामुळे इथल्या जैवविविधतेचे संपूर्ण दर्शन घडते. पामलगौतम आणि परलकोटा या नद्यांमुळे येथील जैवविविधता अधिक समृद्ध होते. या नद्या केवळ सौंदर्यवृद्धी करत नाहीत, तर येथील वन्यजीवांसाठी जीवनदायी स्रोत म्हणून काम करतात. घनदाट जंगल आणि मोकळ्या गवताळ भागांनी भरलेला हा परिसर विविध प्रकारच्या वनस्पती आणि प्राण्यांसाठी एक आदर्श निवास आहे.

  • वनस्पती (फ्लोरा)
    भामरागड अभयारण्य हे केवळ वन्यजीवांसाठीच नव्हे, तर वनस्पतीशास्त्राच्या अभ्यासकांसाठी ही एक अनमोल खजिना आहे. येथे आंबा, जांभूळ, कुसुम आणि बांबू यांसारखे वृक्ष मोठ्या प्रमाणात आढळतात. हे वृक्ष जंगलाच्या परिसंस्थाचा समतोल राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. जमिनीवर नील, तारोटा आणि कुडा यांसारखी झुडपे असून, ही झुडपे अभयारण्यात राहणाऱ्या प्राण्यांसाठी निवारा आणि अन्नाचा महत्त्वाचा स्रोत ठरतात. हि समृद्ध वनसंपदा जंगलातील जैवविविधतेला आधार देत असून, संपूर्ण पर्यावरण साखळी टिकवण्यास मदत करते. त्यामुळे, भामरागड केवळ एक अभयारण्य नसून येथील निसर्गाचा श्वास आहे !
  • वन्यजीव (फॉना)
    भामरागड वन्यजीव अभयारण्य हे वन्यजीव प्रेमींसाठी एक अद्वितीय ठिकाण आहे. येथे तुम्हाला अनेक दुर्मिळ आणि आकर्षक प्राणी पाहायला मिळतील. जंगलातील बिबटे हे अत्यंत चपळ आणि प्रभावशाली शिकारी असून, त्यांचे अस्तित्व जंगलाच्या वैभवात भर टाकते. स्लॉथ बेअर (अस्वल) हा सौम्य स्वभावाचा असला तरी त्याची ताकद अफाट असते. रान डुकरं आणि भेकर खुलेपणाने संचार करत जंगलातील पर्यावरण संतुलित ठेवतात. तसेच, नीलगाय आणि उडणारी खार हे प्राणी अभयारण्याचे वेगळेपण अधोरेखित करतात.
    फक्त प्राणीच नाही, तर येथे पक्ष्यांचेही अद्भुत जग आहे. मोर आपले रंगीबेरंगी पंख पसरून जंगलाच्या सौंदर्यात भर टाकतात तर जंगली कोंबडी आवाजाने संपूर्ण जंगल भारावून टाकते. अशा विविध प्राणी-पक्ष्यांच्या सान्निध्यात, भामरागड हे निसर्गप्रेमींसाठी आणि छाया चित्रकारांसाठी एक परिपूर्ण असा स्वर्ग आहे. प्रत्येक पावलागणिक, हे जंगल जिवंत वाटते आणि इथला प्रत्येक अनुभव अविस्मरणीय ठरतो!

स्थानिक आदिवासींची समृद्ध संस्कृती

भामरागड अभयारण्य केवळ निसर्गसंपत्तीने समृद्ध नसून ते येथे राहणाऱ्या गोंद आणि माडिया या आदिवासी जमातींमुळे सांस्कृतिकदृष्ट्या ही समृद्ध आहे. या जमाती अनेक पिढ्यांपासून जंगलाच्या कुशीत राहत आहेत आणि त्यांचे निसर्गाशी एक अतूट नाते आहे. त्यांची परंपरा, जीवनशैली आणि निसर्गसंवर्धनाबद्दलची जाणीव ही अनोखी असून, ती सहजीवन आणि शाश्वत जगण्याचा उत्तम आदर्श निर्माण करते.

त्यांचे नृत्यप्रकार, वास्तुशैली, पारंपरिक उपचार पद्धती, तसेच तत्त्वज्ञान हे पर्यावरणाशी सुसंगत आहे. त्यामुळे भामरागड हे केवळ वन्यजीव प्रेमींसाठी नव्हे, तर संस्कृती अभ्यासकांसाठी एक प्रेरणादायक स्थळ ठरते. येथे भेट देणे म्हणजे निसर्ग आणि मानव यांच्यातील सुसंवाद अनुभवण्याचा एक अप्रतिम प्रवास आहे !

भेट देण्यासाठी उत्तम काळ

फेब्रुवारी ते मे हा काळ वन्यजीव निरीक्षणासाठी सर्वाधिक अनुकूल मानला जातो. उन्हाळ्यात तापमान वाढल्याने प्राणी पाणवठ्यांजवळ मोठ्या प्रमाणात जमा होतात, ज्यामुळे त्यांचे सहज निरीक्षण करता येते. विशेषतः वन्यजीव फोटोग्राफीसाठी हा हंगाम अत्यंत योग्य ठरतो, कारण प्राणी नैसर्गिक अवस्थेत आणि सहज दिसतात जी छायाचित्रकारांसाठी पर्वणी ठरते. अभयारण्याच्या या हंगामातील सफारी रोमांचक आणि संस्मरणीय ठरतात, त्यामुळे या काळात भेट देण्याचे नियोजन केल्यास जंगलातील समृद्ध जैवविविधतेचा उत्कृष्ट अनुभव घेता येईल.

भामरागडला कसे पोहोचाल?

भामरागड अभयारण्य हे घनदाट जंगलांनी वेढलेले असूनही येथे पोहोचण्यासाठी विविध मार्ग उपलब्ध आहेत. प्रवाशांसाठी हवाई, रेल्वे आणि रस्त्याने प्रवास करण्याच्या सोयी उपलब्ध आहेत.

भामरागडसाठी सर्वात जवळचे विमानतळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ – नागपूर आहे, जे सुमारे ३०६ किमी अंतरावर आहे. येथून खाजगी वाहने किंवा बसने पुढील प्रवास करता येतो.

सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन बल्लारपूर आहे, जे १७८ किमी अंतरावर आहे. बल्लारपूरहून बस किंवा खासगी वाहनाद्वारे पुढील प्रवास करता येतो.

भामरागडला जाण्यासाठी सर्वात जवळचे बसस्थानक अहेरी आहे, जे ७० किमी अंतरावर आहे. अहेरीहून भामरागडसाठी स्थानिक वाहतूक सहज उपलब्ध आहे, जी तुम्हाला थेट अभयारण्यात पोहोचवते. यापैकी कोणताही मार्ग निवडून तुम्ही भामरागडच्या निसर्गसंपन्न वातावरणाचा अनुभव घेऊ शकता.

निवास व्यवस्था

भामरागड वन्यजीव अभयारण्यात कॅम्पिंग करण्यास परवानगी नसली तरी, महाराष्ट्र वन विभागाच्या व्यवस्थापनाखालील विश्रांतीगृह आणि अतिथीगृह उपलब्ध आहेत. ही निवासस्थानं निसर्गाच्या सान्निध्यात राहण्याचा सुरक्षित आणि आरामदायक अनुभव देतात. जर तुम्हाला जंगलाच्या अगदी जवळ राहण्याचा अनोखा आनंद घ्यायचा असेल, तर अलापल्ली येथील उपवनसंरक्षक (वन्यजीव) कार्यालयात आगाऊ नोंदणी करणे आवश्यक आहे. भामरागडच्या जंगल सफारीला जाताना निवासाची योग्य व्यवस्था आधीच निश्चित करणे महत्त्वाचे आहे. वेळेवर आरक्षण केल्यास तुम्हाला निसर्गाच्या कुशीत, वन्यजीवांच्या सान्निध्यात एक अविस्मरणीय अनुभव घेता येईल.

जवळची पर्यटनस्थळे

भामरागडच्या जवळ हेमलकसा येथे वसलेला “लोक बिरादरी प्रकल्प” हा केवळ एक संस्था नसून, समाजसेवेचे जिवंत उदाहरण आहे. थोर समाजसेवक बाबा आमटे यांनी चालू केलेले आणि डॉ. प्रकाश आमटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी चालू ठेवलेले हे केंद्र वंचित आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी तसेच वन्यजीव संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण कार्य करत आहे. येथे आरोग्यसेवा, शिक्षण आणि मानवतेच्या आधारावर आदिवासी समाजाला उभारी देण्याचे कार्य केले जाते. भामरागड अभयारण्याला भेट देताना या प्रेरणादायी प्रकल्पाचा अनुभव घेणे ही देखील एक अविस्मरणीय संधी आहे. निसर्ग आणि सामाजिक कार्य यांचा अनोखा संगम हेमलकसा येथे अनुभवता येतो, जो प्रत्येकाने नक्कीच पाहावा!

पर्यटकांसाठी महत्वाची माहिती

भामरागड वन्यजीव अभयारण्यात तुमचा प्रवास सुरक्षित आणि आनंददायक होण्यासाठी काही महत्त्वाचे नियम पाळणे गरजेचे आहे. शांतता राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण मोठ्या आवाजामुळे वन्यजीव अस्वस्थ होऊ शकतात आणि त्यांच्या नैसर्गिक वर्तणुकीत व्यत्यय येऊ शकतो. प्राण्यांचा आदर राखा,त्यांना त्रास देऊ नका किंवा खाऊ घालण्याचा प्रयत्न करू नका, कारण यामुळे त्यांच्या नैसर्गिक आहारसाखळीत बाधा येऊ शकते.

प्रवासादरम्यान पाणी, हलके स्नॅक्स आणि प्राथमिक उपचार साहित्य सोबत ठेवावे, जेणेकरून गरज भासल्यास ते उपयुक्त ठरेल. जंगलात मिसळणारे हिरवट, मळकट रंगाचे कपडे परिधान करावेत, जेणेकरून तुम्ही पर्यावरणाशी सुसंगत राहाल आणि प्राण्यांना अस्वस्थ वाटणार नाही. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, अभयारण्याचे नियम पाळा आणि जबाबदार पर्यटक बना. निसर्ग आणि वन्यजीव जपल्यास हे अभयारण्य पुढील पिढ्यांसाठी तितकेच सुंदर आणि समृद्ध राहील!

भामरागड अभयारण्याला का भेट द्यावी?

भामरागड वन्यजीव अभयारण्य हे केवळ संरक्षित क्षेत्र नसून, निसर्गाच्या कुशीत वसलेले पारंपरिक संस्कृतीचे केंद्र आणि निसर्ग प्रेमींसाठी एक उत्तम ठिकाण आहे. येथे तुम्ही घनदाट जंगले, वाहणाऱ्या नद्या आणि दुर्मिळ वन्यजीवांना अगदी जवळून पाहू शकता. बिबटे, अस्वल, नीलगाय, उडणारी खार आणि रंगीबेरंगी पक्षी या ठिकाणाच्या जैवविविधतेला अधिक समृद्ध करतात.

याशिवाय गोंद आणि माडिया आदिवासींची पारंपरिक जीवनशैली अनुभवण्याची संधी येथे मिळते. जर तुम्ही वन्यजीव प्रेमी, निसर्ग छायाचित्रकार किंवा शांततेत वेळ घालवू इच्छिणारे असाल, तर भामरागड तुमच्यासाठी आदर्श स्थान आहे. जंगल सफारी, निसर्ग भ्रमंती आणि स्थानिक संस्कृतीशी जवळीक साधण्याची संधी येथे मिळते.

भामरागडला भेट देणे म्हणजे निसर्गाच्या कुशीत रममाण होण्याचा आणि जीवनाच्या गजबजाटातून काही काळ निसर्गाच्या सान्निध्यात शांतता शोधण्याचा अनुभव आहे!

Travel Essentials

Here are the travel essentials one should know

Weather

Tropical climate with hot summers, monsoon rains, and cool winters

Ideal Duration

Best Time

November to March, when the weather is pleasant and wildlife sightings are more frequent.

Top Attractions

Discover the beauty and culture of Maharashtra through our curated experiences

Elephant

Tiger

How to Reach

By Air

The nearest airport to Bhamragarh Wildlife Sanctuary is Nagpur Airport, approximately 370 km away. From Nagpur, you can travel by road via private transport or taxi to reach the sanctuary.

By Train

The nearest railway station to Bhamragarh Wildlife Sanctuary is Gadchiroli Railway Station, located about **80 km** away. From there, you can hire a taxi or use local transport to reach the sanctuary.

By Road

Bhamragarh Wildlife Sanctuary is well-connected by road. You can reach the sanctuary from Gadchiroli, which is about 80 km away, or from Chandrapur, approximately 200 km away.
Scroll to Top