जळगाव जिल्ह्याची ओळख

महाराष्ट्राच्या उत्तर-पश्चिम भागात वसलेला जळगाव जिल्हा हा निसर्गसौंदर्य, समृद्ध शेती आणि वैविध्यपूर्ण परंपरांनी नटलेला प्रदेश आहे. “Banana Capital of India” म्हणून ओळखला जाणारा हा जिल्हा ज्वालामुखीय सुपीक माती आणि समतोल हवामानामुळे शेतीमध्ये अग्रस्थानी आहे. येथे मोठ्या प्रमाणावर कापूस, केळी आणि डाळींचे उत्पादन होते.

जळगावचे भौगोलिक वैशिष्ट्यही खास आहे. उत्तरेला अजस्र सातपुडा पर्वतरांगांचा डोंगराळ प्रदेश आहे तर दक्षिणेला अजिंठा पर्वतरांगांचे वैभव दिसते. तापी नदी या जिल्ह्याचा मध्यस्थानी असून ती दक्षिण भारतातील मोजक्याच पश्चिमवाहिनी नद्यांपैकी एक आहे.

येथील हवामान अत्यंत वैविध्यपूर्ण आहे. उन्हाळ्यात तापमान ४५°C पर्यंत जाते तर थंडीत हवामान आल्हाददायक राहते जे शेतीसाठी आणि स्थानिक संस्कृतीसाठी अनुकूल ठरते. या हवामानातील बदलामुळे जळगाव जिल्ह्याचे वेगळेपण उठून दिसते आणि येथील शेती व जीवनशैलीवर त्याचा मोठा प्रभाव आणि परिणाम दिसून येतो.

येथील प्रमुख भाषा मराठी असली तरी स्थानिक अहिराणी भाषा बोलली जाते. जळगावची खाद्यसंस्कृती साधी आहे. जिथे बाजरी,गहू,भात हे आणि यापासून तयार होणारे पदार्थ अधिक प्रमाणात आढळतात.

जळगावचा इतिहास

एकेकाळी पूर्व खानदेश म्हणून ओळखला जाणारा जळगाव जिल्हा हा प्राचीन राजवटी, वैविध्यपूर्ण संस्कृती आणि ऐतिहासिक घटनांनी घडलेला प्रदेश आहे. जळगाव या नावाचा उगम फारूखी राजवंशाच्या काळात झाल्याचे मानले जाते किंवा कदाचित त्याचा संबंध महाभारतातील खांडववनाशी असावा. यावरून या भूमीच्या खोलवर रुजलेल्या इतिहासाची जाणीव होते.

येथे अनेक संस्कृतींनी आपला ठसा उमटवला आहे. बौद्ध राजवटींनी येथे अप्रतिम शिल्प कोरीव लेण्या आणि मंदिरे उभारली. त्यानंतर येथे सातवाहन,चालुक्य आणि मुघल राजवटी आल्या ज्यामुळे हा प्रदेश विविध लोकसंस्कृती आणि विचारांचा संगम बनला.

१७००च्या दशकात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने होळकरांकडून खानदेश जिंकला. रॉबर्ट गिल हे या भागाचे पहिले प्रशासक बनले आणि त्यांनी अनेक बदल घडवून आणले. १९०६ मध्ये खानदेशचे दोन भाग पडले आणि त्यातून पूर्व खानदेश म्हणजेच आजचा जळगाव निर्माण झाला. १९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाला आणि १९६० मध्ये महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यावर जळगाव एका महत्त्वाचा जिल्ह्या म्हणून उदयास आला.

जळगाव आपल्या समृद्ध संस्कृतीचा अभिमान बाळगतो. अहिराणी बोलीत कविता करणाऱ्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे साहित्य संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय आहे. मराठा सरदार तुळाजीभाऊ भोईटे यांनी बांधलेली भव्य भोईटे गढी हा ऐतिहासिक वारसा सांगणारा महाल आजही जळगावच्या इतिहासाची साक्ष देतो.

याशिवाय, १९३६ मध्ये यवल तालुक्यातील फैजपूर येथे अखिल भारतीय काँग्रेस अधिवेशन पार पडले होते जे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील एक महत्त्वाचे पाऊल ठरले. इतिहास, संस्कृती आणि स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृती जपणारा जळगाव आजही आपली सांगत उभा आहे.

जळगावची सुप्रसिद्ध केळीची शेती

“Banana Capital of India” म्हणून ओळखला जाणारा जळगाव जिल्हा केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. येथील सुपीक माती आणि अनुकूल हवामान केळीच्या भरघोस उत्पादनाला हातभार लावतात. जिल्ह्यात प्रवास करताना तुम्हाला हिरव्या गालिचासारख्या केळीच्या बागा दिसतील. हा नजारा डोळ्यांना सुखावणारा असून स्थानिक अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा आहे.

जळगावच्या केळीची मागणी संपूर्ण देशभरातुन होते. ही केळी परदेशातही निर्यात केली जातात. केळीवर आधारित अनेक स्वादिष्ट पदार्थ येथील समृद्ध कृषी वारशाची साक्ष देतात.

जळगावमधील पर्यटन स्थळे

  • धार्मिक स्थळे
    १. श्री मंगळदेव मंदिर अमळनेर: भारताच्या मोजक्या जागृत देवस्थानांपैकी एक! श्री मंगळदेव मंदिर याला अत्यंत आध्यात्मिक महत्त्व आहे. अनेक शतकांपूर्वी उभारले गेलेले हे मंदिर १९३३ मध्ये जीर्णोद्धारानांतर पुन्हा नव्याने उभे राहिले आहे. अनेक वर्षे दुर्लक्षित राहिलेल्या या स्थळाला आता एक नवीन तेजस्वी रूप प्राप्त झाले आहे. येथे आलेल्या भाविकांना दैवी शक्तीची जाणीव होते यामुळेच या मंदिराला लोक मोठ्या भक्तिभावाने भेट देतात.
    २. श्री क्षेत्र पद्मालय: एका सुंदर डोंगरावर वसलेले श्री क्षेत्र पद्मालय हे भारतातील अडीच गणपतीपीठांपैकी एक आहे. येथे आमोद आणि प्रमोद नावाच्या दोन स्वयंभू गणेशमूर्ती आहेत. मंदिराच्या परिसरात असलेले कमळ तलाव आणि भीमकुंड यामुळे या स्थळाला आणखी महत्त्व प्राप्त झाले आहे. मंदिराच्या आसपासचा परिसर औषधी वनस्पतींनी नटलेला आहे.
    ३. मनुदेवी मंदिर: सातपुडा पर्वतांच्या निसर्गरम्य परिसरात वसलेले मनुदेवी मंदिर स्थानिक लोकांसाठी कुलदेवतेचे ठिकाण आहे. ५०० मीटर उंच डोंगरावर वसलेल्या या मंदिरावर जाण्यासाठी एक सुंदर पायी मार्ग आहे. जिथे दर्शनासाठी जाणारे भाविक “जय मनुदेवी” अशा जयघोषात चालत जातात. ही यात्रा फक्त श्रद्धेचीच नसून निसर्गाच्या शांततेचा अनुभव घेण्याचीही आहे.
  • किल्ले
    १. परोळा किल्ला: जळगाव जिल्हा त्याच्या दुर्गसंस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे. जर तुम्हाला इतिहास आणि संस्कृती जाणून घ्यायची असेल तर परोळा किल्याला नक्की भेट द्या. १५०० च्या दशकात बांधलेला हा किल्ला अप्रतिम स्थापत्यशैलीचे दर्शन घडवतो. त्याचबरोबर बोरी नदीच्या काठावरील रमणीय परिसर या किल्ल्याच्या सौंदर्यात अधिक भर घालतो.
  • निसर्गरम्य स्थळे
    १. उणापदेव गरम पाण्याचा झरा: सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी वसलेले उणापदेव हे एक शांत आणि पवित्र ठिकाण आहे. जिथे वर्षभर गरम पाण्याचा झरा वाहतो. हा झरा गोमुखातून वाहणाऱ्या जलधारेसारखा दिसतो. या पाण्याने त्वचाविकार बरे होतात असे मानले जाते त्यामुळे त्याला विशेष महत्त्व आहे. उणापदेवजवळच सुनापदेव आणि निजरदेव ही रमणीय ठिकाणे आहेत जी भगवान रामाच्या कथांशी जोडलेली आहेत.
  • अन्य आकर्षणे
    १. फरकांदे झुलते मनोरे: एरंडोलपासून १६ कि.मी. अंतरावर उतावडी नदीच्या काठावर हे झुलते मनोरे उभे आहेत. १५ मीटर लांबीचे हे मनोरे जुन्या काळातील अद्भुत स्थापत्यशैलीचे उदाहरण आहेत. विशेष म्हणजे एका मनोऱ्याला हलवले की दुसरा आपोआप हलतो. हे मनोरे २५० वर्षांपूर्वी बांधले गेले आहेत असे मानले जाते. इतिहास आणि स्थापत्यशास्त्र आवडणाऱ्यांसाठी हे ठिकाण खरोखरच अभ्यासण्याजोगे आहे.

भेट देण्यासाठी उत्तम काळ

जळगावला भेट द्यायची असेल तर ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा सर्वोत्तम कालावधी आहे. या महिन्यांत हवामान सोयीस्कर आणि आल्हाददायक असल्याने तुम्ही पर्यटनाचा मनमुराद आनंद घेऊ शकता. निसर्ग आपल्या सौंदर्याची उजळ छटा दाखवतो तसेच उष्णतेचा त्रास न होता बाहेरच्या अनेक रोमांचक उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळते.

जून ते सप्टेंबर हा पावसाळ्याचा मोसम असतो. या काळात संपूर्ण परिसर हिरवाईने नटलेला असतो पण सततच्या पावसामुळे प्रवासाचे नियोजन बिघडू शकते. त्यामुळे जळगावच्या सौंदर्याचा पूर्ण आनंद लुटायचा असेल तर हिवाळ्यात भेट देणे उत्तम!

कालावधीवैशिष्ट्ये
ऑक्टोबर ते फेब्रुवारीआल्हाददायक हवामान, पर्यटनासाठी उत्तम, निसर्गाच्या सौंदर्याचा आनंद, आऊटडोअर ऍक्टिव्हिटीजसाठी योग्य वेळ
जून ते सप्टेंबरपावसाळा, हिरवाईने नटलेला परिसर, पण सततच्या पावसामुळे प्रवासात अडथळे येऊ शकतात

जळगाव जिल्ह्याला का भेट द्यावी?

शेतीची समृद्धी, ऐतिहासिक वारसा, संस्कृतीचे वैभव आणि निसर्गसौंदर्य यांचा अनोखा मिलाफ असलेला जळगाव हे प्रवासप्रेमींसाठी एक आवर्जून भेट देण्यासारखे ठिकाण आहे. येथे तुम्ही केळीच्या मोठाल्या बागा पाहू शकता. रंगीबेरंगी सण-उत्सवांचा आनंद घेऊ शकता आणि निसर्गरम्य स्थळांवर ट्रेकिंगचा रोमांचसुद्धा अनुभवू शकता. जळगावच्या भटकंतीत तुम्हाला स्मरणीय आणि अप्रतिम अनुभव नक्कीच मिळेल!

तुमच्या जळगाव भेटीचे अनुभव मित्र-परिवारासोबत शेअर करायला विसरू नका!

प्रवासासाठी आवश्यक गोष्टी

प्रवासासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींची माहिती येथे दिली आहे.

हवामान

29 - 41°C

आदर्श कालावधी

१ दिवस

सर्वोत्तम वेळ

नोव्हेंबर ते फेब्रुवारी

प्रमुख आकर्षणे

आमच्या खास निवडक अनुभवांद्वारे महाराष्ट्राचे सौंदर्य आणि संस्कृती जाणून घ्या.

अमळनेरचे श्री मंगल देव मंदिर

अमळनेर येथील श्री मंगल देव मंदिर हे संपूर्ण भारतातील अत्यंत प्राचीन, दुर्मिळ आणि जागृत मंदिरांपैकी एक आहे.

श्री क्षेत्र पद्मालय

श्री क्षेत्र पद्मालय, जळगावपासून सुमारे ३० किमी अंतरावर, भगवान गणेशाला समर्पित आहे.

उनपदेव गरम पाण्याचा झरा

उनपदेव हे सातपुडा पर्वत रांगेच्या पायथ्याशी वसलेले असून, तेथील दुर्गम अशा पवित्र स्थळांपैकी एक आहे.

फरकांडेचे हेलकावणारे मनोरे

एरंडोलपासून १६ किमी अंतरावर उतावडी नदीच्या काठावर असलेले 'स्विंगिंग टॉवर्स' (हालणारे मनोरे) हे प्राचीन बांधकाम तंत्राचे एक उत्तम उदाहरण आहेत.

संत मुक्ताबाई मंदिर

संत मुक्ताबाई मंदिर हे या भागातील एक प्राचीन मंदिर असून, येथे देवी मुक्ताबाईंची स्थानिक देवता म्हणून पूजा केली जाते.

मनुदेवी मंदिर

महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्हा आपल्या भव्य सांस्कृतिक आणि धार्मिक स्थळांसाठी प्रसिद्ध आहे.

कसे पोहोचाल

विमानाने

जळगाव विमानतळ शहराच्या मध्यवर्ती भागापासून ६ किमी अंतरावर स्थित आहे. सर्वात जवळचे देशांतर्गत विमानतळ औरंगाबाद येथे (सुमारे १६० किमी अंतरावर) आहे, जिथे गाडीने जाण्यासाठी ४ तासांपेक्षा कमी वेळ लागतो. आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी, सर्वात जवळचे प्रमुख विमानतळ मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे आहे, जे जळगावपासून सुमारे ४१० किमी अंतरावर आहे.

रेल्वेने

जळगाव रेल्वे जंक्शन हे महाराष्ट्रातील प्रमुख शहरांशी तसेच नवी दिल्ली, बेंगळुरू, म्हैसूर, लखनौ, चेन्नई, कन्याकुमारी, पुरी, अहमदाबाद, जयपूर आणि पाटणा यांसारख्या भारतातील इतर महत्त्वाच्या शहरांशी उत्तमरीत्या जोडलेले आहे. लोकमान्य टिळक एक्सप्रेस, नवजीवन एक्सप्रेस आणि कर्नाटक एक्सप्रेस यांसारख्या गाड्या या जंक्शनवरून धावतात.

रस्त्याने

जळगावमध्ये रस्ते वाहतुकीची उत्तम सुविधा असून, येथे खाजगी आणि सार्वजनिक बसेसची वारंवार उपलब्धता असते. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) इंदूर, मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, सुरत आणि इतर प्रमुख शहरांशी जळगावला जोडणारी व्यापक सेवा चालवते, ज्यामुळे रस्ते प्रवास सुलभ आणि सोयीस्कर होतो.
Scroll to Top