अकोला जिल्ह्याची ओळख

अकोला जिल्ह्यातून प्रवास करताना तुम्हाला पारंपरिक संस्कृती आणि आधुनिक प्रगती यांचा सुंदर संगम झालेला दिसेल. इथे एकाच वेळी तुम्ही जुन्या ऐतिहासिक वास्तूंचा आनंद घेऊ शकता आणि त्याच्या बरॊबर महाराष्ट्राच्या अप्रतिम ग्रामीण जीवनशैलीचा देखील आस्वाद घेऊ शकता.

अकोल्याच्या माणसांच्या हृदय आपुलकीने तुम्ही भारावून जाल! इतिहास, निसर्ग किंवा विविध संस्कृतींविषयी जिज्ञासा असलेल्या लोकांसाठी अकोला जिल्हा म्हणजे एक उत्तम स्थळ आहे.

अकोल्याचा समृद्ध इतिहास

अकोला जिल्ह्याभोवती भटकताना तुम्हाला अनेक प्राचीन उत्खनन स्थळे दिसतील, ज्यातून आपल्या पूर्वजांचे जीवन कसे होते, याची झलक मिळते. या भागाचा उल्लेख जुन्या हिंदू ग्रंथांमध्येही सापडतो, ज्यामुळे अकोल्याच्या इतिहासाला एक गूढ रंग मिळालेला आहे.

ब्रिटिश काळाने अकोल्यात मोठे बदल घडवून आणले. ततकालापासून हा जिल्हा कापसाच्या व्यापारासाठी एक महत्त्वाचे केंद्र बनला आणि यामुळे चांगले रस्ते, रेल्वे, आणि शाळा यांसारख्या पायाभूत सुविधा विकसित झाल्या.

आज अकोला एक आधुनिक जिल्हा म्हणून पुढे जात आहे, ज्याने आपल्या प्राचीन इतिहासाला या प्रवासात सांभाळून ठेवले आहे. इथले शिक्षण आणि उद्योग क्षेत्र प्रगत असूनही सांस्कृतिक मूल्यांचे जतन झालेले इथे आढळून येते. अकोल्याच्या गजबजलेल्या बाजारपेठा, नव्याने उभारलेल्या शैक्षणिक संस्था, आणि अतिथीचा मान राखणारे लोक तुम्हाला हा सुंदर समतोल अनुभवण्याची संधी देतील.

अकोल्यामधील पर्यटन स्थळे

  • धार्मिक स्थळे
    अकोला जिल्ह्यातील मंदिरे, स्मारके, आणि वास्तुकला समुद्ध आध्यात्मिक वारसा आणि प्रदीर्घ ऐतिहासिक वैभवाचे दर्शन घडवतात.
    1. राजेश्वर मंदिर:
    भगवान शंकराला अर्पण केलेले राजेश्वर मंदिर हे अकोल्याच्या मध्यवर्ती भागातील एक आध्यात्मिक स्थळ आहे. या प्राचीन मंदिराच्या सुबक कोरीव कामामुळे या भागातील पुरातन परंपरा दिसते तर शांत वातावरणामुळे मंदिराच्या प्रांगणात पाऊल ठेवताच तुम्हाला श्रद्धा आणि शांततेचा अनुभव येतो.
  • निसर्गरम्य स्थळे
    1. मेळघाट व्याघ्र प्रकल्प:
    निसर्ग आणि वन्यजीवांच्या प्रेमींसाठी अकोला जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्प हा संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. घनदाट जंगलातून फिरताना सातपुडा पर्वतांचे शांत आणि मनोहर सौंदर्य तुम्हाला भुरळ पाडेल. जर तुम्ही लक्षपूर्वक पाहिले, तर तुम्हाला भव्य बंगाल वाघासह अनेक वनस्पती आणि प्राणी इथे आढळून येतील. मेळघाट व्याघ्र प्रकल्प वन्यजीवप्रेमींसाठी एक नंदनवन आहे. इथे सफारीचा आनंद आणि विविध वन्यजीव पाहण्याची एकदा नक्की संधी घ्या. सफरी दरम्यान तुमची दुर्बिण आणि कॅमेरा सोबत ठेवा म्हणजे या जंगलातील सौंदर्य आणि अनुभव कायमस्वरूपी तुमच्या आठवणींमध्ये राहील.

    वन्यजीवआवासपाहण्यासाठी सर्वोत्तम वेळ
    बंगाल वाघघनदाट जंगलसकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा
    भारतीय गवागवताळ प्रदेशदिवसभर
    अस्वलडोंगराळ भागसकाळी लवकर
    शेकरुझाडांची टोकंदुपारच्या सुमारास

    2. पूर्णा नदी:
    पूर्णा नदी अकोल्याच्या दृश्याला अधिक सुंदर आणि शांत बनवते. या नदीकाठाने तुम्ही निवांत फेरफटका मारू शकता, जिथे तुम्हाला सुरेख सूर्यास्त पाहता येतो आणि शांततेचा अनुभव घेता येतो. ही नदी हंगामी स्थलांतर करणाऱ्या अनेक पक्ष्यांसाठी विसाव्याचे ठिकाण असल्यामुळे तुम्ही पक्षीनिरीक्षणाचाही आनंद लुटू शकता.
    3. काटेपूर्णा अभयारण्य:
    निसर्गाच्या अधिक जवळ जाण्यासाठी काटेपूर्णा वन्यजीव अभयारण्याला भेट द्या. हा दडलेला खजिना तुम्हाला विविध प्रकारचा निसर्ग पाहण्याची संधी देतो. येथे पानगळीच्या जंगलांपासून,निरनिराळे पक्षी, प्राणी ते कुरणांचा भाग अनुभवण्यास मिळतो. अभयारण्यात फिरताना तुम्हाला बिबट्या, अस्वलापासून विविध प्रकारची हरणेही दिसतात.

  • गड आणि किल्ले
    1. नरनाळा किल्ला:
    नैसर्गिक सौंदर्याव्यतिरिक्त, नरनाळा किल्ल्याच्या स्थापत्य महत्त्वावर एक नजर टाकायलाच हवी. जाफराबाद, नरनाळा, आणि तेलियागड या तीन किल्ल्यांचा समावेश असलेल्या या भागात हिंदू आणि इस्लामी स्थापत्यशैलींचे अद्वितीय मिश्रण पाहण्यास मिळते. किल्ल्याच्या व्यवस्थित राखलेल्या तटबंदी, दरवाजे, आणि पाण्याच्या टाक्या पाहून तुम्हाला याच्या ऐतिहासिक महत्त्वाची जाणीव होईल.
    2. बाळापूर किल्ला:
    इतिहासाच्या पाऊलखुणा अनुभवण्यासाठी भव्य बाळापूर किल्ल्याला भेट द्या. इमाद शाही राजवटीच्या १५व्या शतकातील ही वास्तू अद्भुत बांधकाम कौशल्याचे प्रतीक आहे. किल्ल्याच्या मोठ्या दरवाज्यांतून आणि बारीक कलाकुसर केलेल्या वास्तूंमधून फिरताना तुम्हाला भूतकाळात गेल्याचा अनुभव येईल. किल्ल्याच्या सर्वोच्च ठिकाणी जाऊन अकोल्याचे विहंगम दृश्य पाहता येते.

ऍडव्हेंचर स्पोर्ट्स

महाराष्ट्रातील अकोला जिल्हा सुंदर निसर्गामध्ये ट्रेकिंग आणि कॅम्पिंग सारख्या रोमांचक आऊटडोअर ऍडव्हेंचर्सचीही संधी देतो.

  • सातपुडा पर्वतरांगांमधील ट्रेकिंग
    सातपुडा पर्वतरांगांमधील विविध प्रकारच्या भूभागामुळे नवशिक्यांपासून ते अनुभवी गिर्यारोहकांसाठीही येथे अनेक ट्रेल्स आहेत. चिखलदरा आणि नरनाळा किल्ल्याच्या लोकप्रिय ट्रेकिंग मार्गांचा अनुभव नक्की घ्या.
  •  कॅम्पिंग
    अकोल्याच्या जंगलातील जादू अनुभवण्यासाठी एक रात्र तरी निरभ्र आकाश व तारकांच्या छताखाली कॅम्पिंग करा. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या आसपास अनेक कॅम्पिंग साइट्स आहेत, ज्या तुम्हाला निसर्गाशी जोडण्यासाठी एक अद्वितीय संधी देतात. मात्र या ठिकाणांची नैसर्गिक सुंदरता जपण्यासाठी जबाबदारीने कॅम्पिंगच्या नियमनाचे पालन करा.

स्थानिक कलात्मक वस्तू उत्पादने खरेदी

अकोला हा विशेष करुन इथल्या रंगीबेरंगी हातमाग कापडांसाठी प्रसिद्ध आहे. ज्यावर पारंपरिक पद्धतीने हातमागावर विणलेले बारीक आणि आकर्षक नक्षीकाम असते. पर्यटक इथल्या विणकाम केंद्रांना भेट देऊन अकोल्याच्या खास नक्षीदार चमकदार साड्या, हाताने विणलेली सुती कापडे, आणि सुंदर रचनेच्या शाली खरेदी करू शकतात.

भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ

हंगाममहिनेठळक वैशिष्ट्ये
हिवाळाऑक्टोबर – फेब्रुवारीआल्हाददायक तापमान आणि स्वच्छ आकाशाचा आनंद. उष्णतेच्या त्रासाविना बाह्य साहसांचा आनंद घ्या. काटेपूर्णा वन्यजीव अभयारण्यात स्थलांतरित पक्ष्यांचे दर्शन अनुभवा . दिवाळी आणि मकरसंक्रांतीसारख्या सणांमध्ये सहभागी व्हा.
उन्हाळामार्च – मेमेळघाटमध्ये सकाळच्या सफारींमध्ये प्राणी पाहण्यासाठी ही सर्वोत्तम वेळ आहे! आंब्यांच्या उत्सवांद्वारे या भागातील प्रसिद्ध फळांचा आनंद घ्या तसेच कमी गर्दीमुळे शांत आणि सुखद वातावरण अनुभवा.
पावसाळाजून – सप्टेंबरहिरवीगार निसर्गदृश्ये, ताजेतवाने धबधबे आणि वाहणाऱ्या नद्या! सातपुडा पर्वतरांगेतील धुक्यानी भरलेले मंत्रमुग्ध करणारे वातावरण आणि गणेश चतुर्थीचा रंगीबेरंगी आणि आनंदमय उत्सव अनुभवा.

अकोला जिल्ह्याला का भेट द्यावी?

अकोला जिल्ह्यात प्रवाशांसाठी विविध अनुभवांची खाण आहे. ऐतिहासिक वारसा, निसर्गाचे बहुरंगी सौंदर्य आणि चविष्ट खाद्यसंस्कृती अशा अनेक गोष्टी इथे अनुभवता येतील. त्यामुळेच निसर्गाच्या सान्निध्यात शांतता शोधायची असेल, स्थानिक संस्कृतीत रमायचे असेल किंवा ऍडव्हेंचर स्पोर्ट्समध्ये स्वतःला आव्हान द्यायचे असेल तर अकोला तुम्हाला निराश करणार नाही. इथल्या प्रत्येक टप्प्यावर मिळणारे आश्चर्य आणि समाधान यामुळेच अकोला जिल्हा “तुमच्या प्रवासाच्या यादीत” असायलाच हवा.

प्रवासासाठी आवश्यक गोष्टी

प्रवासासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींची माहिती येथे दिली आहे.

हवामान

22 - 33°C

आदर्श कालावधी

२-३ दिवस

सर्वोत्तम वेळ

ऑक्टोबर ते फेब्रुवारी

प्रमुख आकर्षणे

आमच्या खास निवडक अनुभवांद्वारे महाराष्ट्राचे सौंदर्य आणि संस्कृती जाणून घ्या.

भगवान महादेव गुहा

बुलढाणा जिल्ह्यात अनेक धार्मिक पर्यटन स्थळे आहेत. यांपैकी नंदुरा येथील हनुमानाची मूर्ती हे एक महत्त्वाचे धार्मिक पर्यटन स्थळ आहे. येथे भगवान हनुमानाची १०५ फूट उंच मूर्ती आहे. ही मूर्ती बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या संख्येने स्थानिक आणि परदेशी पर्यटकांना आकर्षित करते.

कापशी तलाव

कपशी तलाव – निसर्गाच्या सानिध्यातील एक स्वच्छ आणि निर्मळ जलाशय. अकोल्यापासून जवळच असलेले कपशी तलाव हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. ब्रिटिश राजवटीत या प्रसिद्ध तलावाची निर्मिती करण्यात आली होती. येथील नैसर्गिक सौंदर्य अतिशय विलोभनीय आहे आणि परदेशातून येणारे स्थलांतरित पक्षी हे या ठिकाणचे आणखी एक खास आकर्षण आहे.

नेहरू पार्क

बुलढाणा जिल्ह्यात अनेक धार्मिक पर्यटन स्थळे आहेत. यांपैकी नंदुरा येथील हनुमानाची मूर्ती हे एक महत्त्वाचे धार्मिक पर्यटन स्थळ आहे. येथे भगवान हनुमानाची १०५ फूट उंच मूर्ती आहे. ही मूर्ती बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या संख्येने स्थानिक आणि परदेशी पर्यटकांना आकर्षित करते.

नर्नाळा किल्ला - एक अविश्वसनीय किल्ला

बुलढाणा जिल्ह्यात अनेक धार्मिक पर्यटन स्थळे आहेत. यांपैकी नंदुरा येथील हनुमानाची मूर्ती हे एक महत्त्वाचे धार्मिक पर्यटन स्थळ आहे. येथे भगवान हनुमानाची १०५ फूट उंच मूर्ती आहे. ही मूर्ती बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या संख्येने स्थानिक आणि परदेशी पर्यटकांना आकर्षित करते.

नर्नाळा वन्यजीव अभयारण्य

समृद्ध वनस्पती आणि प्राणीजीवनाचे निवासस्थान असलेले नारनाला वन्यजीव अभयारण्य अकोला शहरापासून सुमारे १५० किलोमीटरच्या परिसरात सुप्रसिद्ध नारनाला वन्यजीव अभयारण्य आहे. या परिसरातील वनस्पती आणि प्राणीजीवनाच्या विपुलतेमुळे या अभयारण्याला सर्वदूर प्रसिद्धी मिळाली आहे. याव्यतिरिक्त, जीवशास्त्र, पौराणिक कथा, इतिहास, निसर्गरम्यता आणि मनोरंजन यांसारख्या क्षेत्रांतही हे अभयारण्य महत्त्वपूर्ण आहे.

बाळापूर किल्ला

बालापूर किल्ला हा उत्कृष्ट वास्तुकला असलेला एक प्राचीन किल्ला आहे. पावसाळ्यात अकोल्यापासून बालापूर किल्ल्यापर्यंत रस्त्याने २६ किलोमीटरचा प्रवास करता येतो. विशेषतः, या किल्ल्याची तटबंदी आणि इतर वास्तूकाम त्यांच्या अत्यंत बारकाव्यांनी युक्त अशा रचनेसाठी प्रसिद्ध आहेत. बालापूर किल्ल्याची निर्मिती सम्राट औरंगजेबाच्या मुलाने केली होती.

काटेपूर्णा अभयारण्य

बुलढाणा जिल्ह्यात अनेक धार्मिक पर्यटन स्थळे आहेत. यांपैकी नंदुरा येथील हनुमानाची मूर्ती हे एक महत्त्वाचे धार्मिक पर्यटन स्थळ आहे. येथे भगवान हनुमानाची १०५ फूट उंच मूर्ती आहे. ही मूर्ती बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या संख्येने स्थानिक आणि परदेशी पर्यटकांना आकर्षित करते.

ओम श्री बारा ज्योतिर्लिंग शिव मंदिर

बुलढाणा जिल्ह्यात अनेक धार्मिक पर्यटन स्थळे आहेत. यांपैकी नंदुरा येथील हनुमानाची मूर्ती हे एक महत्त्वाचे धार्मिक पर्यटन स्थळ आहे. येथे भगवान हनुमानाची १०५ फूट उंच मूर्ती आहे. ही मूर्ती बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या संख्येने स्थानिक आणि परदेशी पर्यटकांना आकर्षित करते.

सालासर बालाजी मंदिर

बुलढाणा जिल्ह्यात अनेक धार्मिक पर्यटन स्थळे आहेत. यांपैकी नंदुरा येथील हनुमानाची मूर्ती हे एक महत्त्वाचे धार्मिक पर्यटन स्थळ आहे. येथे भगवान हनुमानाची १०५ फूट उंच मूर्ती आहे. ही मूर्ती बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या संख्येने स्थानिक आणि परदेशी पर्यटकांना आकर्षित करते.

राज राजेश्वर मंदिर

राज राजेश्वर मंदिर हे एक श्रद्धेय हिंदू तीर्थक्षेत्र आहे. हे प्राचीन राज राजेश्वर मंदिर सुप्रसिद्ध अकोला किल्ल्याच्या आवारात स्थित आहे. भगवान शिव हे या मंदिराचे आराध्य दैवत असून, ते येथे भक्तांना 'लिंग' स्वरूपात दर्शन देतात. दरवर्षी शेकडो भाविक या मंदिराला भेट देतात.

कसे पोहोचाल

विमानाने

अकोल्याच्या सर्वात जवळचे विमानतळ नागपूर येथील ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ’ हे आहे, जे सुमारे २५० किलोमीटर अंतरावर आहे. विमानतळावरून अकोल्याला जाण्यासाठी तुम्ही टॅक्सी भाड्याने घेऊ शकता किंवा सार्वजनिक वाहतुकीचा वापर करू शकता.

रेल्वेने

अकोला जंक्शन हे मुंबई-नागपूर रेल्वे मार्गावरील एक प्रमुख रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मुंबई, पुणे, नागपूर, दिल्ली आणि कोलकाता यांसारख्या शहरांशी उत्तमरीत्या जोडलेले आहे. या मार्गांवर अनेक एक्सप्रेस आणि पॅसेंजर गाड्या धावतात, ज्यामुळे अकोल्याला जाणे-येणे सोयीचे ठरते.

रस्त्याने

अकोला हे नागपूर, औरंगाबाद, पुणे आणि मुंबई यांसारख्या प्रमुख शहरांशी रस्त्यांच्या जाळ्याद्वारे उत्तमरीत्या जोडलेले आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ अकोल्यातून जात असल्यामुळे, येथे कार किंवा बसने सहजपणे पोहोचता येते. अकोल्याला ये-जा करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस आणि खाजगी टॅक्सींची सुविधा उपलब्ध आहे.
Scroll to Top