श्री महालक्ष्मी जगदंबा माता (कोराडी, नागपूर)

श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान, कोराडी – सविस्तर पर्यटन मावहत

नागपूर शहराजवळील कोराडी येथे वसलेले श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान हे विदर्भातील एक अत्यंत प्रसिद्ध धार्मिक व पर्यटनस्थळ आहे. नैसर्गिक वातावरण, भव्य मंदिर परिसर आणि गाढ श्रद्धा यांमुळे हे ठिकाण भाविकांसह पर्यटकांसाठीही विशेष आकर्षण ठरते.

या मंदिरातील स्वयंभू देवी श्री महालक्ष्मी जगदंबा देवी या आदिशक्तीचे जागृत व सशक्त स्वरूप मानले जाते. देवी ही लक्ष्मी (समृद्धी), दुर्गा (शक्ती) आणि जगदंबा (मातृस्वरूप) यांचे एकत्रित रूप असून, हे स्थान “जागृत देवस्थान” म्हणून ओळखले जाते. भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारी, संकटांपासून संरक्षण देणारी आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा व मार्गदर्शन देणारी अशी देवीची अपार श्रद्धा आहे. त्यामुळे दूरदूरहून भाविक येथे दर्शनासाठी येतात.

मंदिर विस्तीर्ण क्षेत्रात पसरलेला असून, येथे स्वच्छता, सुरक्षा आणि भक्तांसाठी आवश्यक सोयीसुविधांची उत्तम व्यवस्था करण्यात आलेली आहे. मंदिरात दररोज नियमित पूजा, आरती आणि धार्मिक विधी पार पडतात. विशेषतः नवरात्रोत्सव हा येथे अतिशय भव्य
आणि उत्साहात साजरा केला जातो, ज्यावेळी सुमारे २० लाखांहून अधिक भाविक दर्शनासाठी येतात. या काळात मंदिर परिसर भक्ती, उत्सव आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी गजबजून जातो.

संस्थान केवळ धार्मिक कार्यापुरते मर्यादित नसून समाजोपयोगी उपक्रमांतही सक्रिय आहे. येथे अन्नछत्र द्वारे दररोज हजारो भाविकांना प्रसाद व भोजन दिले जाते. तसेच सेवानंद विद्यालय या शैक्षणिक संस्थेमार्फत शिक्षण क्षेत्रातही योगदान दिले जाते. स्वच्छता
अभियान, तीर्थदर्शन योजना ,आरोग्य शिबिरे, आणि विविध सामाजिक प्रकल्पांद्वारे संस्थान समाजसेवेची परंपरा जपते.

पर्यटकांसाठी हे ठिकाण आध्यात्मिक शांतता, सांस्कृतिक अनुभव आणि व्यवस्थीत सुविधा यांचा सुंदर संगम प्रदान करते. नागपूरपासून सहज पोहोचता येणारे हे ठिकाण धार्मिक पर्यटनासाठी एक महत्त्वाचे केंद्र असून, श्रद्धा आणि सेवाभाव यांचा अनुभव देणारे
प्रेरणादायी स्थान आहे.

Travel Essentials

Here are the travel essentials one should know

Weather

Ideal Duration

Best Time

Top Attractions

Discover the beauty and culture of Maharashtra through our curated experiences

How to Reach

By Air

By Train

By Road

Scroll to Top