जालना जिल्ह्याची ओळख
महाराष्ट्राच्या मध्यभागी वसलेला जालना जिल्हा मराठवाड्यातील एक महत्त्वाचा भाग आहे. इतिहास पाहता हा प्रदेश निजामशाहीचा भाग होता पण मराठवाडा मुक्ती संग्रामानंतर भारतात समाविष्ट झाला. जालना जिल्ह्याची स्थापना १ मे १९८१ रोजी औरंगाबाद व परभणी जिल्ह्यांच्या काही भागांना विभाजित करून करण्यात आली. उद्योगधंद्यांच्या बाबतीत जालना विशेष ओळखले जाते.हायब्रीड बियाणे उत्पादन, स्टील री-रोलिंग आणि कृषी आधारित उद्योग येथे मोठ्या प्रमाणावर विकसित झाले आहेत. तसेच महाराष्ट्रातील सर्वाधिक मोसंबी उत्पादन करणारा जिल्हा म्हणूनही जालना प्रसिद्ध आहे.
जालना हा विविध संस्कृतींचा संगम आहे. येथे अनेक समुदाय गुण्यागोविंदाने राहतात यामुळे सामाजिक एकतेचा सुंदर आविष्कार दिसून येतो. मंदिरे ,मशिदी, जैन मंदिरे यांसारखी विविध धार्मिक स्थळे येथे आहेत. जी परस्पर ऐक्याची जाणीव निर्माण करतात. जिल्ह्यात नाटक, संगीत आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची समृद्ध परंपरा आहे. स्थानिक शैक्षणिक संस्था देखील सांस्कृतिक उपक्रमांना प्रोत्साहन देतात ज्यामुळे पारंपरिक कलांचे जतन आणि सर्जनशील अभिव्यक्तीला वाव मिळतो.
मराठी ही येथील मुख्य भाषा आहे. ती जिल्ह्याला महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाशी जोडते. जालना जिल्ह्याची पारंपरिक खाद्यसंस्कृतीही विशेष उल्लेखनीय आहे. येथे पुरणपोळी, कोथिंबिरी वडी, पोहे यांसारख्या चविष्ट पदार्थ विशेष लोकप्रिय आहेत. दिवाळी, होळी, गणेश चतुर्थी आणि शारदीय नवरात्र अशा सणांमध्ये जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर उत्सव व यात्रांचे आयोजन केले जाते.जेथे भाविक आणि पर्यटक मोठ्या संख्येने सहभागी होतात.
संस्कृती, उद्योग आणि सामाजिक ऐक्य यांचा सुंदर मिलाफ म्हणजे जालना जिल्हा. महाराष्ट्राचा एक सुसंवादी आणि सतत प्रगतीशील असलेला भाग!
जालना जिल्ह्याचा समृद्ध इतिहास
जालना शहर कुंडलिका नदीच्या काठाशी उभे आहे. पूर्वी जनकपूर या नावाने ओळखले जाणारे हे शहर नंतर जालना म्हणून प्रसिद्ध झाले. एका श्रीमंत वस्त्रोद्योगात कार्यरत असणाऱ्या मुस्लिम व्यापाऱ्याने या शहराला नवीन नाव दिले असे सांगितले जाते. ऐतिहासिक दृष्टिकोनातूनही जालन्याचे महत्त्व मोठे आहे. रामायण काळात माता सीता येथे काही काळ वास्तव्यास होती अशी समजूत आहे. त्यामुळे जालना हे केवळ ऐतिहासिक नव्हे तर धार्मिक आणि सांस्कृतिक वारशानेही समृद्ध ठिकाण आहे. येथे असलेल्या अनेक प्राचीन मंदिरांमुळे शहराला एक आध्यात्मिक ओळख प्राप्त झाली आहे.
इतिहासाच्या विविध टप्प्यांमध्ये जालन्यावर अनेक सत्ताधाऱ्यांचे वर्चस्व राहिले. मुघल सम्राट अकबराच्या काळात जालन्याचा समावेश मुघल साम्राज्यात झाला होता आणि अबुल फजल याला येथे जहागिरी दिली गेली होती. १७६० मध्ये झालेल्या उदगीरच्या लढाईत पुण्याच्या पेशव्यांनी हे क्षेत्र ताब्यात घेतले तर १८०३ मधील असायेच्या लढाईत इंग्रज अधिकारी कर्नल स्टीव्हन्सने येथे महत्त्वाची भूमिका बजावली. पुढे निजामशाहीच्या अधिपत्याखाली जालना राहिले नंतर ते हैदराबाद संस्थानात समाविष्ट झाले. अखेरीस १९८१ मध्ये जालना स्वतंत्र जिल्हा म्हणून अस्तित्वात आले.
आज जालना शिक्षण, उद्योग आणि सांस्कृतिक विविधतेने भरभराटीला आलेले शहर आहे. त्याचा समृद्ध इतिहास आणि गतकाळातील वारसा यामुळे हे शहर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक नकाशावर एक महत्त्वाचे स्थान मिळवते.
जालन्यामधील पर्यटन स्थळे
इतिहास आणि धार्मिक परंपरांचा वारसा लाभलेले जालन्यामध्ये पर्यटकांसाठी अनेक आकर्षक स्थळे आहेत.
- धार्मिक स्थळे
१. मच्छ्योदरी देवी मंदिर: एका माशासारख्या आकाराच्या डोंगरावर वसलेले हे प्राचीन मंदिर देवी मच्छ्योदरीला समर्पित आहे. श्रद्धाळूंनी येथे प्रार्थना केली की त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते. विशेषतः ऑक्टोबर महिन्यातील नवरात्र उत्सवाच्या जत्रेत येथे मोठ्या संख्येने भाविक येतात.
२. जांब समाधी: हे गाव समर्थ रामदास स्वामींशी संबंधित असून प्रभू श्रीरामाच्या भक्तांसाठी एक महत्त्वाचे धार्मिक ठिकाण आहे. येथे रामनवमी मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते आणि यावेळी मोठ्या प्रमाणावर धार्मिक कार्यक्रम होतात.
३. आनंदी स्वामी मंदिर: मराठा सरदार महादजी शिंदे यांनी उभारलेले २५० वर्षे जुने हे मंदिर संत आनंदी स्वामी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ बांधले आहे. हे जुन्या जालना भागात स्थित आहे. येथे आषाढी एकादशीच्या जत्रेत भाविकांची मोठी गर्दी होते.
४. श्री गणेश मंदिर राजूर: गणेश पुराणात उल्लेख असलेले हे संपूर्ण पीठ गणपतीचे प्रमुख धार्मिक स्थळ आहे. विशेषतः अंगारकी चतुर्थीच्या दिवशी येथे भाविकांची मोठी गर्दी होते.
५. काळी मशीद (जुमा मशीद): ४०० वर्षे जुनी काळ्या दगडांची भव्य मशीद जालना शहराच्या ऐतिहासिक वास्तूंपैकी एक आहे. जमशेद खान यांनी बांधलेल्या या मशिदीचे नक्षीकाम व स्थापत्यशास्त्रामुळे ती पर्यटकांचे विशेष आकर्षण ठरते.
६. मजार-ए-मौला नूरुद्दीन साहेब: दावूदी बोहरा समाजाच्या मौला नूरुद्दीन साहेबांचा हा मकबरा ऐतिहासिक महत्त्वाचे स्थान आहे. त्यांच्या ज्ञान व संस्कृतीतील योगदानामुळे हे ठिकाण जालन्याच्या इतिहासात याला विशेष स्थान आहे. - किल्ले
१. जालना किल्ला (मस्तगड): १७२५ मध्ये काबिल खानने निजाम उल मुल्कच्या आदेशाने बांधलेला हा किल्ला इतिहासप्रेमींसाठी एक उत्तम स्थळ आहे. येथे फारसी शिलालेख व खास वैशिष्ट्यपूर्ण विहीर पाहायला मिळते. हिवाळ्यात येथे भेट देणे सर्वात योग्य असते, कारण वातावरण आल्हाददायक असते.
अन्य आकर्षणे
१. मोती बाग आणि मोती तलाव: निसर्गप्रेमींसाठी शांत, सुंदर, रंगीबेरंगी फुलांनी सजलेल्या या बागेत लहान मुलांसाठी मिनी ट्रेन आणि स्ट्रीट फूडचा आनंद याठिकाणी अनुभवता येतो. फुलांच्या बहरासाठी वसंत ऋतू हा येथे भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ आहे.
ही सर्व स्थळे जालनाच्या समृद्ध ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरेची उत्तम उदाहरणे आहेत. धर्म, इतिहास आणि परंपरा यांचा अनोखा संगम पाहण्यासाठी जालन्याला नक्की भेट द्या!
भेट देण्यासाठी उत्तम काळ
जालनाला भेट देण्याचा योग्य काळ निवडल्यास तुमचा प्रवास अधिक सुखद आणि संस्मरणीय होऊ शकतो. ऑक्टोबर ते फेब्रुवारी हे हिवाळी महिने जालना सहलीसाठी उत्तम आहेत. या काळात हवामान आल्हाददायक असते त्यामुळे पर्यटन आणि बाहेरील उपक्रमांचा मनमुराद आनंद घेता येतो.
महिना | हवामान | उल्लेखनीय गोष्टी / उपक्रम |
ऑक्टोबर | सुखद, मध्यम तापमान | सण-उत्सव तयारी, आकर्षक सजावट, सांस्कृतिक कार्यक्रम |
नोव्हेंबर | गार वाऱ्यांची सुरुवात | ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळे पाहण्यास योग्य, खुल्या जागेत फिरण्याचा आनंद |
डिसेंबर | थंड आणि आरामदायी | शांतपणे पर्यटनाचा आनंद, सणांचा उत्साह, स्थानिक परंपरांचा अनुभव |
हिवाळी महिने ( जानेवारी – फेब्रुवारी ) | थंड आणि आल्हाददायक | ऐतिहासिक आणि सांस्कृतिक स्थळे पाहण्यास योग्य, पारंपरिक खाद्यसंस्कृतीचा आस्वाद |
जालना जिल्ह्याला का भेट द्यावी?
महाराष्ट्राच्या हृदयस्थानी वसलेले जालना हे इतिहास, संस्कृती आणि अध्यात्माचा अनमोल खजिना आहे. मुघल आणि मराठा काळाचा प्रभाव आजही येथील ऐतिहासिक स्थळांमधून स्पष्ट दिसतो. जालना किल्ला आणि मच्छ्योदरी देवी मंदिर हे त्याचे उत्कृष्ट उदाहरण आहेत.
धार्मिक सौहार्दाचे प्रतीक असलेल्या या शहरात आनंदी मंदिर आणि काळी मशीद यांसारखी विविध धर्मांची पवित्र स्थळे आहेत. जे शहराच्या विविधतेला अधिक समृद्ध करतात. येथे दरवर्षी भरणाऱ्या जत्रा आणि सणांमुळे जालनाचे रंगतदार सौंदर्य अधिक खुलते.
इतिहास आणि परंपरेव्यतिरिक्त येथील सुंदर बागा, स्वादिष्ट स्थानिक खाद्यसंस्कृती आणि औद्योगिक क्षेत्रातील प्रगती जालनाला एक परिपूर्ण पर्यटनस्थळ बनवते. हिवाळ्यात येथे भेट देणे सर्वात आनंददायी ठरते कारण तेव्हा हवामान आल्हाददायक असते.
संस्कृती, परंपरा आणि आधुनिकतेचा अनोखा संगम अनुभवायचा असेल तर जालनाची सफर एक अविस्मरणीय आठवण ठरेल!
Travel Essentials
Here are the travel essentials one should know
Top Attractions
Discover the beauty and culture of Maharashtra through our curated experiences

Jamb Samartha, Ghansawangi
Jamb Samarth, the place where the Sant Ramdas Swami born

Matsyodari Devi Temple, Ambad
The Matsyodari Devi Temple of Ambad situated in south 21 k.m. away from Jalna city

Guru Ganesh Tapodham
Guru Ganesh Tapodham is an important holy place of Jain peoples in the Jalna city.

Shree Ganesh Temple, Rajur
The GANESH temple of Rajur is situated in north 25 k.m. away from JALNA city