जळगाव जिल्ह्याची ओळख
महाराष्ट्राच्या उत्तर-पश्चिम भागात वसलेला जळगाव जिल्हा हा निसर्गसौंदर्य, समृद्ध शेती आणि वैविध्यपूर्ण परंपरांनी नटलेला प्रदेश आहे. “भारताची केळी राजधानी” म्हणून ओळखला जाणारा हा जिल्हा ज्वालामुखीय सुपीक माती आणि समतोल हवामानामुळे शेतीमध्ये अग्रस्थानी आहे. येथे मोठ्या प्रमाणावर कापूस, केळी आणि डाळींचे उत्पादन होते.
जळगावचे भौगोलिक वैशिष्ट्यही खास आहे. उत्तरेला अजस्र सातपुडा पर्वतरांगांचा डोंगराळ प्रदेश आहे तर दक्षिणेला अजंता पर्वतरांगांचे वैभव दिसते. तापी नदी या जिल्ह्याचा मध्यस्थानी असून ती दक्षिण भारतातील मोजक्याच पश्चिमवाहिनी नद्यांपैकी एक आहे.
येथील हवामान अत्यंत वैविध्यपूर्ण आहे. उन्हाळ्यात तापमान ४५°C पर्यंत जाते तर थंडीत हवामान आल्हाददायक राहते जे शेतीसाठी आणि स्थानिक संस्कृतीसाठी अनुकूल ठरते. या हवामानातील बदलामुळे जळगाव जिल्ह्याचे वेगळेपण उठून दिसते आणि येथील शेती व जीवनशैलीवर त्याचा मोठा प्रभाव आहे.
येथील प्रमुख भाषा मराठी असली तरी स्थानिक अहिराणी भाषा बोलली जाते. जळगावची खाद्यसंस्कृतीही साधी आहे. जिथे बाजरी,गहू,भात हे आणि यापासून तयार होणारे पदार्थ अधिक प्रमाणात आढळतात.
जळगावचा इतिहास
एकेकाळी पूर्व खानदेश म्हणून ओळखला जाणारा जळगाव जिल्हा हा प्राचीन राजवटी, वैविध्यपूर्ण संस्कृती आणि ऐतिहासिक घटनांनी घडलेला प्रदेश आहे. जळगाव या नावाचा उगम फारूखी राजवंशाच्या काळात झाल्याचे मानले जाते किंवा कदाचित त्याचा संबंध महाभारतातील खांडववनाशी असावा. यावरून या भूमीच्या खोलवर रुजलेल्या इतिहासाची जाणीव होते.
येथे अनेक संस्कृतींनी आपला ठसा उमटवला आहे. बौद्ध राजवटींनी येथे अप्रतिम शिल्प कोरीव लेण्या आणि मंदिरे उभारली. त्यानंतर येथे सातवाहन,चालुक्य आणि मुघल राजवटी आल्या ज्यामुळे हा प्रदेश विविध लोकसंस्कृती आणि विचारांचा संगम बनला.
१७००च्या दशकात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने होळकरांकडून खानदेश जिंकल. रॉबर्ट गिल हे या भागाचे पहिले प्रशासक बनले आणि त्यांनी अनेक बदल घडवून आणले. १९०६ मध्ये खानदेशचे दोन भाग पडले आणि त्यातून पूर्व खानदेश म्हणजेच आजचा जळगाव निर्माण झाला. १९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाला आणि १९६० मध्ये महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यावर जळगाव एका महत्त्वाचा जिल्ह्या म्हणून उदयास आला.
जळगाव आपल्या समृद्ध संस्कृतीचा अभिमान बाळगतो. अहिराणी बोलीत कविता करणाऱ्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे साहित्य संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय आहे. मराठा सरदार तुळाजीभाऊ भोईटे यांनी बांधलेली भव्य भोईटे गढी हा ऐतिहासिक वारसा सांगणारा महाल आजही जळगावच्या इतिहासाची साक्ष देतो.
याशिवाय, १९३६ मध्ये यवल तालुक्यातील फैजपूर येथे अखिल भारतीय काँग्रेस अधिवेशन पार पडले होते जे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील एक महत्त्वाचे पाऊल ठरले. इतिहास, संस्कृती आणि स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृती जपणारा जळगाव आजही आपली गौरवशाली कहाणी सांगतो.
जळगावची सुप्रसिद्ध केळीची शेती
“भारताची केळीची राजधानी” म्हणून ओळखला जाणारा जळगाव जिल्हा केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. येथील सुपीक माती आणि अनुकूल हवामान केळीच्या भरघोस उत्पादनाला हातभार लावतात. जिल्ह्यात प्रवास करताना तुम्हाला हिरव्या गालिचासारख्या केळीच्या बागा दिसतील. हा नजारा डोळ्यांना सुखावणारा असून स्थानिक अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा आहे.
जळगावच्या केळीची मागणी संपूर्ण देशभरातुनहोते. ही केळी परदेशातही निर्यात केली जातात. केळीवर आधारित अनेक स्वादिष्ट पदार्थ येथील समृद्ध कृषी वारशाची साक्ष देतात.
जळगावमधील पर्यटन स्थळे
- धार्मिक स्थळे
१. श्री मंगळदेव मंदिर अमळनेर: भारताच्या मोजक्या जागृत देवस्थानांपैकी एक! श्री मंगळदेव मंदिर याला अत्यंत आध्यात्मिक महत्त्व आहे. अनेक शतकांपूर्वी उभारले गेलेले हे मंदिर १९३३ मध्ये मोठ्या दुरुस्तीनंतर पुन्हा नव्याने उभे राहिले आहे. अनेक वर्षे दुर्लक्षित राहिलेल्या या स्थळाला आता एक नवीन तेजस्वी रूप प्राप्त झाले आहे. येथे आलेल्या भाविकांना दैवी शक्तीची जाणीव होते यामुळेच या मंदिराला लोक मोठ्या भक्तिभावाने भेट देतात.
२. श्री क्षेत्र पद्मालय: एका सुंदर डोंगरावर वसलेले श्री क्षेत्र पद्मालय हे भारतातील अडीच गणपतीपीठांपैकी एक आहे. येथे आमोद आणि प्रमोद नावाच्या स्वतः प्रकटलेल्या दोन गणेशमूर्ती आहेत. मंदिराच्या परिसरात असलेले कमळ तलाव आणि भीमकुंड यामुळे या स्थळाला आणखी महत्त्व प्राप्त झाले आहे. मंदिराच्या आसपास औषधी वनस्पतींनी नटलेला परिसर आहे जो पर्यटकांच्या शारीरिक आरोग्यासाठी लाभदायक आहे.
३. मनुदेवी मंदिर: सातपुडा पर्वतांच्या निसर्गरम्य परिसरात वसलेले मनुदेवी मंदिर स्थानिक लोकांसाठी कुलदेवतेचे ठिकाण आहे. ५०० मीटर उंच डोंगरावर वसलेले या मंदिरावर जाण्यासाठी एक सुंदर पायी मार्ग आहे. जिथे दर्शनासाठी जाणारे भाविक “जय मनुदेवी” अशा जयघोषात चालत जातात. ही यात्रा फक्त श्रद्धेचीच नसून निसर्गाच्या शांततेचा अनुभव घेण्याचीही आहे. - किल्ले
१. परोळा किल्ला: जळगाव जिल्हा त्याच्या दुर्गसंस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे. जर तुम्हाला इतिहास आणि संस्कृती जाणून घ्यायची असेल तर परोळा किल्याला नक्की भेट द्या. १५०० च्या दशकात बांधलेला हा किल्ला अप्रतिम स्थापत्यशैलीचे दर्शन घडवतो. त्याचबरोबर बोरी नदीच्या काठावरील रमणीय परिसर या किल्ल्याच्या सौंदर्यात अधिक भर घालतो. - निसर्गरम्य स्थळे
१. उणापदेव गरम पाण्याचा झरा: सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी वसलेले उणापदेव हे एक शांत आणि पवित्र ठिकाण आहे. जिथे वर्षभर गरम पाण्याचा झरा वाहतो. हा झरा गायमुखातून वाहणाऱ्या जलधारेसारखा दिसतो. या पाण्याने त्वचाविकार बरे होतात असे मानले जाते त्यामुळे त्याला विशेष महत्त्व आहे. उणापदेवजवळच सुनापदेव आणि निजरदेव ही रमणीय ठिकाणे आहेत जी भगवान रामाच्या कथांशी जोडलेली आहेत. - अन्य आकर्षणे
१. फरकांदे झुलते मनोरे: एरंडोलपासून १६ कि.मी. अंतरावर उतावडी नदीच्या काठावर हे झुलते मनोरे उभे आहेत. १५ मीटर लांबीचे हे मनोरे जुन्या काळातील अद्भुत स्थापत्यशैलीचे उदाहरण आहेत. विशेष म्हणजे एका मनोऱ्याला हलवले की दुसरा आपोआप हलतो असे मानले जाते की हे मनोरे २५० वर्षांपूर्वी बांधले गेले आहेत. इतिहास आणि स्थापत्यशास्त्र आवडणाऱ्यांसाठी हे ठिकाण खरोखरच रोचक आहे.
भेट देण्यासाठी उत्तम काळ
जळगावला भेट द्यायची असेल तर ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा सर्वोत्तम कालावधी आहे. या महिन्यांत हवामान सोयीस्कर आणि आल्हाददायक असल्याने तुम्ही पर्यटनाचा मनमुराद आनंद घेऊ शकता. निसर्ग आपल्या सौंदर्याची उजळ छटा दाखवतो तसेच उष्णतेचा त्रास न होता बाहेरच्या अनेक रोमांचक उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळते.
जून ते सप्टेंबर हा पावसाळ्याचा मोसम असतो. या काळात संपूर्ण परिसर हिरवाईने नटलेला असतो पण सततच्या पावसामुळे प्रवासाचे नियोजन बिघडू शकते. त्यामुळे जळगावच्या सौंदर्याचा पूर्ण आनंद लुटायचा असेल तर हिवाळ्यात भेट देणे उत्तम!
कालावधी | वैशिष्ट्ये |
ऑक्टोबर ते फेब्रुवारी | आल्हाददायक हवामान, पर्यटनासाठी उत्तम, निसर्गाच्या सौंदर्याचा आनंद, बाहेरच्या रोमांचक उपक्रमांसाठी योग्य वेळ |
जून ते सप्टेंबर | पावसाळा, हिरवाईने नटलेला परिसर, पण सततच्या पावसामुळे प्रवासात अडथळे येऊ शकतात |
जळगाव जिल्ह्याला का भेट द्यावी?
शेतीची समृद्धी, ऐतिहासिक वारसा, संस्कृतीचे वैभव आणि निसर्गसौंदर्य यांचा अनोखा मिलाफ असलेला जळगाव हे प्रवासप्रेमींसाठी एक आवर्जून भेट देण्यासारखे ठिकाण आहे. येथे तुम्ही केळीच्या मोठाल्या बागा पाहू शकता. रंगीबेरंगी सण-उत्सवांचा आनंद घेऊ शकता आणि निसर्गरम्य स्थळांवर ट्रेकिंगचा रोमांच अनुभव घेऊ शकता. जळगावच्या भटकंतीत तुम्हाला स्मरणीय आणि अप्रतिम अनुभव नक्कीच मिळेल!
तुमच्या जळगाव भेटीचे अनुभव मित्र-परिवारासोबत शेअर करायला विसरू नका!
Travel Essentials
Here are the travel essentials one should know
Top Attractions
Discover the beauty and culture of Maharashtra through our curated experiences

Shri Mangal Dev Temple of Amalner
Shri Mangal Dev Temple in Amalner is one of the most ancient, rare, and vibrant temples in all of India.

Shree Kshetra Padmalaya
Shree Kshetra Padmalaya, is located at around 30km from Jalgaon, dedicated to Lord Ganesha.

Unapdev Hot Water Fountain
Unapdev is located in the foothills of the Satpuda hill range and it is one of the remote holy places

Swinging Towers Of Farkande
Swinging Towers located 16-km from Erandol on the bank of Utawadi River are a great example of old construction techniques

Saint Muktabai Temple
Saint Muktabai Temple is the region’s ancient temple, with Goddess Muktabai honored as the local deity.

Manudevi Temple
The district of Jalgaon in Maharashtra state is renowned for its magnificent cultural and religious places.