चंद्रपूर जिल्ह्याची ओळख

“ब्लॅक गोल्ड सिटी” म्हणून ओळखला जाणारा चंद्रपूर जिल्हा कोळसा खाणींच्या वारशामुळे प्रसिद्ध आहे. हा जिल्हा धार्मिक, ऐतिहासिक आणि नैसर्गिक सौंदर्याचा अप्रतिम संगम आहे. महाकाली मंदिर,भद्रावती जैन मंदिर आणि अंचलेश्वर महादेव मंदिर यांसारखी प्रसिद्ध तीर्थस्थळे भाविकांना आकर्षित करतात तर चंद्रपूर किल्ला आणि बल्लारपूर किल्ला यांसारखे ऐतिहासिक किल्ले या प्रदेशाच्या समृद्ध स्थापत्य परंपरेचं दर्शन घडवतात.

निसर्गप्रेमींसाठी ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे भारतातील वाघांसाठी प्रसिद्ध असं अभयारण्य आहे. तसेच नील पाणी आणि रमळा तलाव यांसारखी शांत ठिकाणं मनाला प्रसन्नता देतात. महामार्ग, रेल्वेमार्ग आणि विमानतळांमुळे चंद्रपूरला सहजरित्या पोहोचता येते.

समृद्ध इतिहास

चंद्रपूरच्या इतिहासाला सांस्कृतिक आणि भूगर्भीय महत्त्व आहे. झरपत आणि इराई नद्यांच्या संगमावर वसलेलं हे ठिकाण कोळसा आणि चुनखडीसारख्या भरपूर खनिज संपत्तीसाठी ओळखलं जाते. तसेच येथील आदिमानव काळातील ठिकाणे आणि डायनासॉरचे पुरावे या परिसराच्या पूर्व साहित्यिक इतिहासाचा वारस अधोरेखित करतात.

चंद्रपूरची स्थापना गोंड राजा खंडक बल्हारशाह यांनी केली. या शहराच्या उगमाशी अनेक आकर्षक दंतकथा जोडलेल्या आहेत. आजारी असलेले राजकुमार खंडक बल्हाल झरपत नदीच्या पाण्यानी बरे झाले तसेच भगवान अंचलेश्वराच्या दृष्टांताने शहराचे रेखाटन झाले अशा अनेक कथा प्रसिद्ध आहेत.

मौर्य, सातवाहन, यादव यांसारख्या राजवंशांचं शासन पाहिलेल्या या प्रदेशावर नंतर गोंड, मराठा आणि शेवटी १८५३ साली ब्रिटीश साम्राज्याचा अंमल होता. पूर्वी लोकापूर आणि नंतर इंदुपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शहराचं नाव अखेर चंद्रपूर ठेवलं गेलं.

चंद्रपूरचं धार्मिक,सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व आजही जाणवते. येथे महाकाली मंदिरासारखी प्राचीन मंदिरे, गणेश उत्सव आणि दसऱ्यासारखे उत्सव, तसेच आदिवासी परंपरा शहराच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीचं दर्शन घडवतात.

चंद्रपूरमधील पर्यटनस्थळे

प्राचीन मंदिरे,ऐतिहासिक किल्ले आणि नैसर्गिक वन्यजीवांचा मिलाफ असलेले हे ठिकाण पर्यटकांसाठी विविधतेने भरलेले एक उत्तम डेस्टिनेशन आहे.

  • धार्मिक स्थळे
    १. महाकाली मंदिर: चंद्रपूरमधील एक महत्त्वाचे धार्मिक ठिकाण म्हणजे महाकाली मंदिर! काली मातेला अर्पण केलेले हे मंदिर मंगळवारी विशेषतः भक्तांनी गजबजलेले असते. येथे तुम्ही आध्यात्मिक आणि पवित्र वातावरण अनुभवू शकता.
    २. भद्रावती जैन मंदिर: शांत आणि सौंदर्यपूर्ण मूर्तींसाठी प्रसिद्ध असलेले हे जैन मंदिर भक्त आणि पर्यटकांना शांततेचा अनुभव देते. या मंदिराची प्राचीनता आणि सौंदर्य तुम्हाला खूप भावेल!
    ३. अंचलेश्वर महादेव मंदिर: गोंड किल्ल्याच्या जवळ असलेले हे शिवमंदिर धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे. येथे भगवान शंकराच्या पवित्र पायाचे पूजन केले जाते. मंदिराच्या स्थापत्यशैलीत प्राचीन काळाची कलात्मकता आणि नक्षीकामाचे दर्शन घडते. मनःशांतीसाठी तुम्ही इथे नक्की भेट देऊ शकता.
  • किल्ले
    चंद्रपूरमधील ऐतिहासिक किल्ले त्याच्या समृद्ध इतिहासाची साक्ष देतात आणि तुम्हाला त्याच्या भूतकाळातील वैभवाची जाणीव करून देतात.
    १. चंद्रपूर किल्ला: १४०० आणि १५०० च्या दशकात गोंड राजांनी संरक्षणासाठी बांधलेला हा किल्ला त्यावेळच्या स्थापत्यकलेचा उत्तम नमुना आहे. किल्ल्याची तटबंदी आणि प्रवेशद्वारे गोंडांच्या स्थापत्यकलेचे दर्शन घडवतात. येथे गाईड घेऊन तुम्ही संपूर्ण इतिहास जाणून घेऊ शकता.
    २. बल्लारपूर किल्ला: बल्लारपूर गावात असलेला हा चौकोनी किल्ला खंडक्या बल्लाल शाह यांनी बांधला. किल्ल्याच्या मजबूत भिंती आणि बुरुज त्याच्या अभेद्य रचनेची साक्ष देतात.
    ३. माणिकगड किल्ला: सुमारे ८०० च्या दशकात नाग राजवटीत बांधलेला हा किल्ला समुद्रसपाटीपासून ५०७ मीटर उंच डोंगरावर आहे. अप्रतिम निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेला हा किल्ला आज ट्रेकिंग आणि हायकिंग प्रेमींसाठी आवडते ठिकाण आहे.
  • निसर्गरम्य स्थळे
    १. ताडोबा राष्ट्रीय उद्यान: महाराष्ट्रातील पहिले आणि सर्वात मोठे नॅशनल पार्क म्हणून ओळखले जाणारे हे ठिकाण ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प नावाने प्रसिद्ध आहे. येथे बंगाल टायगरसह विविध वन्यजीव पाहायला मिळतात. निसर्गप्रेमी आणि छायाचित्रकारांसाठी हे ठिकाण एक पर्वणीच आहे.
    २. नीलपाणी: वनराईने वेढलेले हे शांत आणि निसर्गरम्य ठिकाण मनःशांतीसाठी आणि नवीन ऊर्जा मिळवण्यासाठी उत्तम आहे.
    ३. रमळा तलाव: कुटुंब किंवा मित्रमंडळींसोबत वेळ घालवण्यासाठी हे ठिकाण एकदम योग्य आहे. शांत पाणी आणि सुंदर निसर्गाचे दर्शन देणारा हा तलाव तुमच्या विशेष पसंतीस उतरेल.

शहरातील रंगतदार स्थानिक बाजारपेठा आणि इराई तलावासारख्या शांत ठिकाणी तुम्ही संध्याकाळी फेरफटका मारत निवांत वेळ घालवू शकता.

भेट देण्यासाठी उत्तम काळ

चंद्रपूर जिल्ह्याच्या प्रवासाची योजना आखताना योग्य काळ निवडणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून तुमचा अनुभव आनंददायी होईल. चंद्रपूरला भेट देण्यासाठी ऑक्टोबर ते मार्च हा सर्वोत्तम काळ मानला जातो. या काळात हवामान आल्हाददायक असते आणि परिसराचे नैसर्गिक सौंदर्य पूर्ण बहरलेले असते. थंड हवामानामुळे आऊटडोअर ऍक्टीव्हिटी, जंगल सफारी आणि ऐतिहासिक स्थळे पाहण्यासाठी हा काळ अत्यंत योग्य ठरतो.

घटक माहिती
सर्वोत्तम प्रवास कालावधी ऑक्टोबर ते फेब्रुवारी (थंड हवामान, बाहेर जाण्यासाठी योग्य)
हवामान परिस्थिती उन्हाळा अत्यंत उष्ण; पावसाळ्यात (जुलै-सप्टेंबर) जोरदार पाऊस पडतो.
वन्यजीव पाहण्याचा सर्वोत्तम काळ ऑक्टोबर ते फेब्रुवारी

चंद्रपूर जिल्ह्याला का भेट द्यावी?

चंद्रपूर जिल्हा तुमच्या सारख्या प्रवाशांसाठी अनुभवांचा खजिना आहे जो तुमच्या प्रत्येक प्रकारच्या अपेक्षा पूर्ण करतो. संपन्न इतिहास, सांस्कृतिक वारसा, नैसर्गिक सौंदर्य आणि वैविध्यपूर्ण वन्यजीवांनी भरलेले हे महाराष्ट्रातील लपलेले रत्न एक अविस्मरणीय अनुभव नक्कीच देतो.

प्राचीन किल्ले पाहणे असो, स्थानिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घेणे असो किंवा वन्यजीव सफारी असो, चंद्रपूरमधील प्रत्येक क्षण तुमच्या मनावर छाप सोडेल. त्यामुळे तुमच्या पुढील प्रवासाची योजना करताना चंद्रपूरचा विचार नक्की करा!

Travel Essentials

Here are the travel essentials one should know

Weather

30 - 44°C

Ideal Duration

1 day

Best Time

October to March

Top Attractions

Discover the beauty and culture of Maharashtra through our curated experiences

Tadoba-Andhari Tiger Reserve

A premier wildlife destination known for its high density of tigers, offering thrilling safaris and wildlife photography opportunities.

Chandrapur Super Thermal Power Station

One of the largest power plants in India, it attracts visitors interested in industrial tours.

Mahakali Temple

An ancient temple located deep within the forest, revered for its spiritual ambiance and historical significance.

Gond Raja Fort

A historical fort that provides insights into the architectural and cultural heritage of the Gond dynasty.

Bhadravati Jain Temple

Known for its intricate carvings and serene environment, this temple is a significant site for Jain pilgrims.

Junona Lake

A popular spot for picnicking and leisure activities, offering beautiful sunset views and a relaxed atmosphere.

How to Reach

By Air

The nearest airport to Chandrapur is Dr. Babasaheb Ambedkar International Airport in Nagpur, approximately 150 kilometers away. From the airport, you can hire a taxi or use public transportation to reach Chandrapur

By Train

Chandrapur Railway Station is well-connected to major cities like Mumbai, Pune, Nagpur, and Hyderabad. Several express and passenger trains operate on these routes, providing convenient access to Chandrapur.

By Road

Chandrapur is well-connected by road to major cities like Nagpur, Aurangabad, Pune, and Mumbai. National Highway 930 passes through Chandrapur, making it easily accessible by car or bus. State transport buses and private taxis are available for travel to and from Chandrapur.
Scroll to Top