अहमदनगर जिल्ह्याची ओळख

अहमदनगर, ज्याला अहिल्यानगर असेही ओळखले जाते, अहिल्याबाई होळकर यांच्या योगदानाला आदरांजली म्हणून हे नाव दिले गेले आहे. महाराष्ट्रातील सर्वांत मोठ्या जिल्ह्यांपैकी एक असलेल्या या जिल्ह्याला सांस्कृतिक वारशाचा समृद्ध इतिहास आहे. अहमदनगर शहर हे जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय असून, पुरातन काळापासून अगदी छत्रपती शिवाजी महाराज, मुघल काळ आणि मराठा साम्राज्याच्या इतिहासाशी अहमदनगर घट्टपणे जोडले गेले आहे. नैसर्गिक सौंदर्य, ऐतिहासिक वास्तू आणि सांस्कृतिक वारसा यांचे अनोखे मिश्रण असलेला हा जिल्हा पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतो.

“संतांची भूमी” आणि “शौर्याचा किल्ला” अशी ओळख असलेल्या अहमदनगरच्या प्रदेशाला समृद्ध ऐतिहासिक वारसा, सांस्कृतिक विविधता, निसर्गसौंदर्य यामुळे महाराष्ट्राच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे.

अहमदनगरचा इतिहास

अहमदनगरचा इतिहास सामर्थ्यशाली राजवंश, शूर योद्धे आणि अप्रतिम वास्तुकलेच्या कथा सांगतो. इथे फिरताना, तुम्हाला जणू भारताच्या इतिहासातील महान नेत्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालत असल्याची भावना येईल.

अहमदनगरच्या इतिहासाचे केंद्र आहे भव्य अहमदनगर/ अहिल्यादेवी किल्ला, जो निझामशाही राजवटीच्या सैनिकी सामर्थ्याचे प्रतीक आहे. १५व्या शतकात बांधला गेलेला हा किल्ला अनेक ऐतिहासिक घटनांना साक्षी राहिला आहे, ज्यामध्ये भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात पंडित नेहरूंनी येथे तुरुंगवास भोगला होता. किल्ल्याच्या भव्य दरवाजांमधून चालत असताना आणि जुन्या भिंतीं बघताना भूतकाळाची भुरळ तुमच्यावर जाणवेल.

चांदबीबी महाल हा आणखी एक प्रेक्षणीय वास्तुकलेचा नमुना आहे. चांदबीबी उर्फ चांद सुलताना या धाडसी राणीच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या महालाने अहमदनगरला मुघलांच्या हल्ल्यांपासून वाचवले होते. महालाचे सविस्तर कोरीव काम आणि शाही रचना पूर्वीच्या राजघराण्याच्या समृद्ध जीवनशैलीची झलक दाखवतात. याच्या जवळच फराह बाग हे निझामशाही राजांचे निवासस्थान असलेले सुंदर उद्यानही नक्कीच पाहण्यासारखे आहे.

अहमदनगरमधील पर्यटन स्थळे

आधीच काही प्रसिद्ध ठिकाणांचा उल्लेख झाला आहे, पण अजूनही अहमदनगर जिल्ह्यात अशा अनेक जागा आहेत ज्या तुमच्या ट्रॅव्हल प्लॅन मध्ये सामील होण्यासारख्या आहेत. ही विविध ठिकाणे अहमदनगरच्या बहुपैलू आकर्षणाची झलक दाखवतात.

  • धार्मिक स्थळे
    1. शिर्डीचे साईबाबा मंदिर जगभरातून भाविकांना आकर्षित करते आणि महाराष्ट्राच्या संमिश्र धार्मिक परंपरांचे अनोखे दर्शन घडवते.
    2. नेवासामधील श्री म्हाळसाकांत देवस्थान हे आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण ठिकाण आहे. हे प्राचीन मंदिर भगवान शंकराला समर्पित असून त्याच्या सूक्ष्म कोरीवकामासाठी आणि शांततेसाठी प्रसिद्ध आहे. या मंदिराच्या आवारात एक संग्रहालय देखील आहे, जिथे या भागाच्या समृद्ध इतिहासाची झलक दाखवणाऱ्या प्राचीन वस्तू पाहता येतात.
  • नैसर्गिक पर्यटन
    1. मुळा धरण: अहमदनगर शहरापासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर आहे. हा लोकप्रिय पिकनिक स्पॉट देखील आहे. इथे धरणाचा विशाल जलाशय आणि भोवतीच्या टेकड्या मिळून एक छानसे निसर्गरम्य ठिकाण बनले आहे लोक येथे एखादा शांत दिवस घालवल्यासाठी येतात. येथे शांत पाण्यात बोटींगचा आनंद घेता येतो किंवा निसर्गरम्य वातावरणात निवांत वेळ घालवता येतो.
    2. रेहकुरी काळवीट अभयारण्य: हे निसर्गप्रेमींसाठी एक अद्भुत ठिकाण आहे. हा संरक्षित भाग अनेक दुर्मिळ भारतीय काळवीट आणि इतर प्राणी प्रजातींसाठी निवासस्थान आहे. गाईडसह सफारी करून या मोहक काळविटांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात पाहण्याचा अनुभव घेता येतो.
    3. भंडारदरा तलाव: हा जिल्ह्यातील सर्वात प्रसिद्ध निसर्ग पर्यटन स्थळांमध्ये अग्रस्थानी आहे. पश्चिम घाटात वसलेला हा मानवनिर्मित तलाव प्रवरा नदीच्या पाण्याने भरतो आणि हिरव्यागार डोंगररांगा याला वेढून आहेत. शांतता शोधणाऱ्यांसाठी हे ठिकाण स्वर्गच आहे. तुम्ही तलावाच्या स्थिर पाण्यात डोंगरांचे प्रतिबिंब पाहू शकता किंवा नौकाविहाराचा आनंद घेऊ शकता.

ऍडव्हेंचर स्पोर्ट्स

अहमदनगर जिल्हा, साहसाची आवड असणाऱ्या आणि आऊटडोअर स्पोर्ट्सचा आनंद घेणाऱ्या लोकांसाठी अनेक रोमांचकारी अनुभव देतो. या भागातील उंचसखल पर्वतरांगा आणि खोल दऱ्या साहसी खेळ आणि निसर्गातील उपक्रमांसाठी एक उत्तम ठिकाण ठरतात.

1. ट्रेकिंग हे या भागातील सर्वोत्तम उपक्रमांपैकी एक आहे, ज्यामध्ये नवशिक्या आणि अनुभवी ट्रेकर्ससाठीसुद्धा अनेक ट्रेल्स आहेत. सह्याद्रीचे रत्न म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रतनगड किल्ल्यापर्यंतचा ट्रेक आव्हानात्मक असला तरी त्यातून मिळणारे परिसराचे अप्रतिम दृश्य तुमचा थकवा विसरायला लावतात. हरिश्चंद्रगड गड, एका उंच सुळक्यावर उभा असून, तो इतिहास आणि निसर्गाचा अनोखा संगम दर्शवतो. किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला दाट जंगलांमधून आणि धबधब्यांच्या वाटांवरून चालावे लागते. किल्ल्यावर पोहोचल्यावर तुम्हाला भव्य कोकण कडा दिसेल, जिथून तुम्ही कोकण विभागाचा दिव्य देखावा अनुभवू शकता. ज्यांना साहसप्रिय अनुभव हवा आहे, त्यांच्यासाठी महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसुबाई शिखरही इथेच आहे. समुद्रसपाटीपासून १६४६ मीटर उंचीवर असलेले हे शिखर चढणे हे एक आव्हान आहे, पण त्यावरून दिसणारे दऱ्यांचे आणि भंडारदरा तलावाचे विहंगम दृश्य तुमचा सगळा शीण घालवून टाकेल.

2. बोटिंग आवडणाऱ्यांसाठी भंडारदरा जलाशय सर्वोत्तम ठिकाण आहे. पावसाळ्यात भरलेला हा तलाव बोटींग, कायकिंग आणि पॅडल बोटींगसाठी उत्तम आहे. शिवाय, येथे मासेमारीचा अनुभवही घेता येतो, कारण या तलावात विविध प्रकारचे मासे सापडतात.

3. काही वेगळं अनुभवायचं असेल, तर सांदण दरीत केव्हिंगचा आनंद घ्या, ज्याला शॅडोजची दरी म्हणतात. हजारो वर्षांत पाण्याने कोरलेल्या या खोल कड्यांमध्ये रॅपलिंग आणि रॉक क्लाइंबिंगचा रोमांच अनुभता येतो. यासोबत सभोवतालचे अप्रतिम निसर्गदृश्य तुमची ट्रेकिंगची मजा वाढवतात.

भेट देण्यासाठी उत्तम काळ

अहमदनगरच्या सहलीचा सर्वाधिक आनंद घेण्यासाठी योग्य ऋतूमध्ये भेट देण्याचा काळ जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

ऑक्टोबर ते मार्च हा कालावधी अहमदनगरला भेट देण्यासाठी सर्वोत्तम आहे, कारण या वेळी हवामान आनंददायक असते आणि आऊटडोअर स्पोर्ट्ससाठीही योग्य असते. पावसाळ्यात (जून ते सप्टेंबर) हिरवीगार झाडे, ओसंडून वाहणारे धबधबे दिसतात, पण काही ट्रेकिंगचे मार्ग आणि साहसी उपक्रम सुरक्षिततेच्या कारणास्तव बंद असतात. उन्हाळा (एप्रिल ते मे) खूप उष्ण असतो, त्यामुळे उष्णतेचा त्रास होणार नसेल तरच या काळात प्रवास करावा.

अहमदनगर जिल्ह्याला का भेट द्यावी?

नेहमीच्या पर्यटन मार्गांपासून दूर जाऊन अहमदनगर/ अहिल्यानगर अशा कमी ओळखल्या गेलेल्या प्रदेशाची अनुभूती घेतल्यावर तुम्हाला महाराष्ट्राचा असा भाग दिसेल, जो बहुतेक पर्यटकांच्या नजरेआड राहतो. येथे राहणारे मैत्रीपूर्ण लोक, अस्सल चवींचा अनुभव, आणि पाहण्यासारख्या आणि करण्यासारख्या गोष्टींचा मोठा खजिना तुम्हाला तुमच्या सहलीनंतरही आठवत राहील.

Travel Essentials

Here are the travel essentials one should know

Weather

27 - 38°C

Ideal Duration

2 - 3 days

Best Time

October to March

Gallery

Top Attractions

Discover the beauty and culture of Maharashtra through our curated experiences

Meher baba samadhi

Meher baba samadhi Meher Baba Samadhi is in Ahmednagar District of Maharashtra State of India, lovingly known as  Meherabad. This is a small walkable hill with “Samadhi”, Babas room and Museum and library etc.,

Cavarly tank museum

Cavarly tank museum Cavalry Tank Museum was established by Armoured Corps Center & school in 1994. Set among pristine lawns it is the only museum of its kind in Asia for the tank enthusiasts. It houses 53 exhibits of World war vintage oldest being the Silver Ghost Rolls Royce Armoured car of 1914.

Bhandardara lake

Bhandardara lake Bhandardara Dam also known as Wilson Dam has its existence on Pravara River and is situated 150 metres above ground level. This dam is located in holiday resort village of Bhandardara on the western coast of India.

Shani maharaja temple

This lies in Ahmednagar district of Maharashtra. Shani maharaja temple Shani Shingnapur[1] or Shani Shinganapur[2] or Shingnapur is a village in the Indian state of Maharashtra. Situated in Nevasa Taluka in Ahmednagar district, the village is known for its popular temple of Shani, the Hindu god associated with the planet (graha) Saturn.

Meherabad

Meherabad is the final resting place of Meher Baba and situated on the outskirts of Ahmednagar, approximately 20 mins from Ahmednagar railway station and 45 mins from Ahmednagar Bus station. The place is serene, tranquil and self-rejuvenating to give you a spiritual high.

Rrandha water

Rrandha water falls This waterfall is the third largest waterfall in Maharashtra state. Near the waterfall, there are some newly built wooden structures for sitting and footover bridges for viewing the falls as well as the river Pravara. One can visit the Ghat as well as the Ghorpada Devi Temple nearby.

Sandhan valley

Sandhan Valley is also known as Valley of Shadows (as the sun’s rays don’t reach the ravines). It is a spectacular canyon in the Sahyadri mountains. It is one of the most challenging and enjoyable treks in Sahyadri. Located near Bhandardara near Igatpuri, Sandhan Valley offers adventure experience like no other.

Shri siddhivinayak temple

Shri siddhivinayak temple Located on the banks of river Bhima, Siddhivinayak Temple, Siddhatek is almost 101km east of Pune in the Karjat Taluka district of Ahmednagar. It is one of the popular temples dedicated to Lord Ganesha. Amruteshwar Temple is ancient and

Amruteshwar temple

King Jhanj of the Shilahar dynasty built it in the 9th Century. This temple is devoted to Lord Shiva and is around 1200 years old. This Temple is built on Black stone and you will find a great architect and great sculpture.

Ahmednagar fort

The Ahmednagar Fort is a fort located close to the Bhingar Nala near Ahmednagar in Maharashtra state western India. It was the headquarters of the Ahmednagar Sultanate. In 1803, it was taken by the British during the Second Anglo-Maratha War. It was used as a prison during the British Raj.

Shiva Temple Parner

Temple of Shiva on either side of the stream There are two temples of Shiva located at a distance of nearly 1.5 km from Parner at the meeting of two small streams and they are locally known as Sangameshvara and Trimbakeshvara temple.It is datable to 12th century AD.

Five stone Gates

Five stone Gates, Tisgaon Five stone Gates were the part of large fortification of medieval origin build during Nizamshahi regime of Ahilyanagar. The gates are built in stone and domes are built in bricks and lime masonry. Three of them have four arches supporting the superstructure while two of them are single arched gates.

Siddheshwar,Devi and Vishnu temple at Toka

A group of three temples at Kayegoan Toka within complex is located at confluence of Rivers Pravara and Godavari.It comprises Siddheshwar Mahadev temple,Devi and Vishnu temple and spacious ghats along the river attached to the temple complex.

Dhokeshwar Caves

The Dhokeshwara Cave is a large hall with triple cells, on the east side of one of two rugged hills rising from a stony plateau. The largest is 18.28m deep and 13.7m wide, front open and supported by two massive square pillars and two pillars and two massive pilasters, a little inside of these another similar row supports a great architrave running right across the temple, and within this again is the shrine, hollowed out of a rectangular block left standing from floor to roof, and surrounded by dark passage

Ratangad

The fort is located at a height of 4250 feet. Ratangad Fort is 400 year old fort, which was used by Maratha warrior Shivaji Maharaj.

Kharda Fort

Khadka fort in taluka Jamkhed, Kharda fort is known as the oldest Shivapatan .On Mar 11, 1795, Marathas defeated Nizam at this place.This fort was built by Sardar Nimbalkar in 1745. The wall of this fort, the entrance is still in good condition and there is a barawa and mosque inside. There are 12 Jyotirlingas in the village and there is a huge crowd of devotees in month Shravan.

How to Reach

By Air

The nearest airport to Ahmednagar is Aurangabad Airport, approximately 120 kilometers away. Alternatively, you can fly to Pune Airport, which is about 120 kilometers away, or to Mumbai Airport, which is around 250 kilometers away. From these airports, you can hire a taxi or use public transportation to reach Ahmednagar.

By Train

Ahmednagar is well-connected by road to Pune, Mumbai, Aurangabad, and other nearby cities. National Highway 60 passes through Ahmednagar, making it easily accessible by car or bus. State transport buses and private taxis are available for travel to and from Ahmednagar.

By Road

Ahmednagar is well-connected by road to Pune, Mumbai, Aurangabad, and other nearby cities. National Highway 60 passes through Ahmednagar, making it easily accessible by car or bus. State transport buses and private taxis are available for travel to and from Ahmednagar.
Scroll to Top