उद्दिष्टे आणि कार्ये

उद्दिष्टे

  • महाराष्ट्राला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्व ऋतूंमध्ये पर्यटनासाठी एक आघाडीचे गंतव्य म्हणून स्थान मिळवून देणे.
  • समावेशी आणि शाश्वत पर्यटनाला प्रोत्साहन देणे जे आर्थिक वाढ, रोजगार निर्मिती आणि ग्रामीण विकासात योगदान देईल.
  • पर्यटन क्षेत्रात धोरणात्मक पाठबळ, प्रोत्साहने आणि व्यवसाय सुलभतेद्वारे सार्वजनिक व खासगी गुंतवणूक आकर्षित करणे.
  • वारसा, अध्यात्मिक, सागरी, साहसी, आरोग्य, पर्यावरणीय, आदिवासी, भौगोलिक संकेतांक (GI) असलेले उत्पादन-आधारित आणि शेती पर्यटन स्थळे यांचा समावेश असलेल्या उच्च क्षमतेच्या पर्यटन परिपथांची ओळख करणे आणि त्यांचा विकास करणे.
  • पर्यटकांच्या अनुभवात सुधारणा करण्यासाठी पायाभूत सुविधा सुधारणा, डिजिटल साधने आणि शेवटच्या टप्प्यापर्यंत जोडणी यामध्ये गुंतवणूक करणे.
  • एकात्मिक विपणन, डिजिटल प्रचार मोहिमा आणि राष्ट्रीय तसेच जागतिक पर्यटन कार्यक्रमांमध्ये सहभाग घेऊन गंतव्य स्थळांची ओळख आणि प्रचार मजबूत करणे.
  • समुदायाधारित पर्यटन मॉडेल्सना प्रोत्साहन देणे आणि आदिवासी व ग्रामीण भागातील समुदाय, महिला आणि युवक यांच्यासह स्थानिक हितधारकांना सशक्त बनवणे.
  • राज्याची दृश्य व अदृश्य सांस्कृतिक परंपरा जसे की पारंपरिक कला, हस्तकला, खाद्यसंस्कृती आणि सांगीतिक/नृत्यकला यांचे संवर्धन, जतन आणि प्रचार करणे.
  • ऑनलाइन बुकिंग प्रणाली, डिजिटल नकाशे आणि कृत्रिम बुद्धिमत्ता-आधारित प्रवास नियोजन साधने यासारख्या तंत्रज्ञान-आधारित पर्यटन प्लॅटफॉर्मच्या विकासाला आणि स्वीकाराला प्रोत्साहन देणे.
  • पर्यटन व आदरातिथ्य क्षेत्रात कौशल्य विकास, प्रशिक्षण आणि क्षमता बांधणीसाठी पाठबळ देणे, जेणेकरून राज्यभर प्रशिक्षित मनुष्यबळाची उपलब्धता सुनिश्चित करता येईल.
  • पर्यटन सेवा आणि पायाभूत सुविधा सुसंगतपणे पोहोचवण्यासाठी विविध विभागांमधील समन्वय आणि हितधारकांमध्ये समन्वय सुनिश्चित करणे.
  • शैक्षणिक संस्था, नागरी समाज आणि खासगी क्षेत्रातील भागीदारीद्वारे पर्यटन परिसंस्थेमध्ये नवप्रवर्तन, उद्यमशीलता आणि संशोधनास प्रोत्साहन देणे.
  • सर्व पर्यटन प्रकल्प आणि योजनेच्या नियोजन, निरीक्षण व परिणाम मूल्यांकनासाठी माहिती-आधारित यंत्रणा राबवणे.

कार्ये

कार्यासननिहाय विषयांचे पर्यटन विभागातील वाटप

कार्यासनविषयाधिन कामकाज
पर्यटन-१
  1. प्रादेशिक पर्यटन विकास योजनेची (RTDS) अंमलबजावणी, निधीची तरतूद, विनियोग व पर्यटन विकासाच्या दृष्टीने पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देणे, पर्यटन स्थळांवरील साधनसामुग्रीचा विकास करणे.
  2. उपरोक्त बाबींशी संबंधीत विधानमंडळीय कामकाज, न्यायालयीन प्रकरणे, कामकाजानुषगिक बैठका आयोजित करणे, नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा करणे, माहिती अधिकार, Online RTI Portal, Online Assembly Portal, Online आपले सरकार Portal वरील तक्रारी, लोकशाही दिन सुनावणी इ.
  3. पर्यटन उप विभागातील सर्व कार्यासनाशी समन्वय साधून माहितीचे एकत्रीकरण, सादरीकरण करणे, इतर प्रशासकीय विभागांना माहिती उपलब्ध करुन देणे, समन्वय विषयक सर्व कामकाज.
  4. वरीष्ठांमार्फत वेळो-वेळी सोपविण्यात येणारे इतर कामकाज
पर्यटन-२
  1. पर्यटन विकासाचे मोठे आराखडे / विशेष प्रकल्प.
  2. अन्य विभागाकडून पर्यटनाशी संबधित प्राप्त झालेल्या धोरणात्मक बाबींशी संबधित अनौपचारिक संदर्भावर कार्यवाही करणे.
  3. उपरोक्त बाबींशी संबंधीत विधानमंडळीय कामकाज, न्यायालयीन प्रकरणे, कामकाजानंषगिक बैठका आयोजित करणे, नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा करणे, माहिती अधिकार, Online RTI Portal, Online Assembly Portal, Online आपले सरकार Portal वरील तक्रारी, लोकशाही दिन सुनावणी इ.
  4. वरीष्ठांमार्फत वेळो वेळी सोपविण्यात येणारे इतर कामकाज.
पर्यटन-३
  1. केंद्रीय अर्थसहाय्यातून राज्यातील पर्यटन स्थळांचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्याबाबत (प्रसाद, स्वदेश दर्शन- १ व २) योजनांशी संबधित कार्यवाही.
  2. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील युवकांना पर्यटन व आदरातिथ्य क्षेत्रातील प्रशिक्षण देऊन रोजगारक्षम बनविण्यासाठी प्रशिक्षण व क्षमता बांधणी योजना.
  3. राज्याच्या पर्यटन विकासाच्या दृष्टीने प्रसिध्दीकरीता देश विदेशातील विविध प्रदर्शने, मेळे आणि उत्सव यामधून महाराष्ट्रातील पर्यटन विषयक बाबीचे दर्शन घडविणे, थंड हवेच्या ठिकाणांचा व सुट्टी शिबीरांचा विकास.
  4. उपरोक्त बाबींशी संबंधीत विधानमंडळीय कामकाज, न्यायालयीन प्रकरणे, कामकाजानंषगिक बैठका आयोजित करणे, नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा करणे, माहिती अधिकार, Online RTI Portal, Online Assembly Portal, Online आपले सरकार Portal वरील तक्रारी, लोकशाही दिन सुनावणी इ.
  5. वरीष्ठांमार्फत वेळो वेळी सोपविण्यात येणारे इतर कामकाज.
पर्यटन-४
  1. पर्यटन धोरण ठरविणे, पर्यटन धोरण १९९९, २००६, २०१६ अंमलबजावणी करणे. त्याअंतर्गत येणाऱ्या सर्व बाबी उदा. साहसी पर्यटन, कृषी पर्यटन, कॅराव्हॅन पर्यटन, “आई” केंद्रीत महिला पर्यटन धोरण इ.
  2. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व पर्यटन संचालनालयाशी संबंधित प्रादेशिक पर्यटन विकास योजनेविषयक (RTDS) वगळून सर्व प्रकरणे.
  3. Institute of Hotel Management, दादर, Institute of Hotel Management, सोलापूर आस्थापना आणि सेवाविषयक बाबी.
  4. उपरोक्त बाबींशी संबंधीत विधानमंडळीय कामकाज, न्यायालयीन प्रकरणे, कामकाजानुषङ्गिक बैठका आयोजित करणे, नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा करणे, माहिती अधिकार, Online RTI Portal, Online Assembly Portal, Online आपले सरकार Portal वरील तक्रारी, लोकशाही दिन सुनावणी इ.
  5. वरीष्ठांमार्फत वेळो वेळी सोपविण्यात येणारे इतर कामकाज
Scroll to Top