पर्यटन विभाग
१०० दिवस कार्यक्रमाची सद्यस्थिती निहाय माहिती
| अ. क्र. | मुद्दा | कार्यवाही पूर्ण /अपूर्ण | पूर्ण असल्यास त्याबाबतची माहिती व शासन निर्णय / फोटो/ ई. अभिलेख किंवा त्याची लिंक | अपूर्ण असल्यास सद्यस्थिती व कार्यवाही पूर्ण करण्याची काल मर्यादा | ||||||||||||||||||
| 1 | राम काल पथ विकास, नाशिक-रचनाकार आणि प्रकल्प सल्लागार नियुक्ती करणे. सविस्तर मुद्दा:- नाशिक येथे 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या पंचवटी परिसरात “राम काल पथ” प्रकल्प राबवण्यात येत आहे. प्रभाव :-
| कार्यवाही पूर्ण |
| |||||||||||||||||||
| 2 | मालवण, सिंधुदुर्ग येथे पाण्याखालील पर्यटन विकसित करणे -INS Guldar जहाज सिंधुदुर्ग येथे आणणे. सविस्तर मुद्दा:- महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत भारतीय नोदलाच्या INS Guldar या निवृत्त जहाजाचे कृत्रिम प्रवाळ तयार करुन सिंधुदुर्ग जिल्ह्यात जागतिक दर्जाचे स्कुबा डायव्हींग आणि पाण्याखालील जीवनाचे आकर्षण निर्माण करण्यात येत आहे. प्रभाव :- सदर प्रकल्प हा भारतातील पाण्याखालील आकर्षणाचा पहिलाच प्रकल्प असल्याने या प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यातील सिंधुदुर्ग पर्यटन क्षेत्राचा विकास होऊन राज्यात पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक वाढून रोजगार निर्मिती होणार आहे. | कार्यवाही पूर्ण |
| |||||||||||||||||||
| 3 | अमूर्त सांस्कृतिक वारसा (ICH)- पालघर परिसरात आदिवासी पर्यटनाला चालना- आदिवासी लाभार्थ्यांची क्षमता वाढ करणे व आदिवासी महोत्सवाचे आयोजन करणे. सविस्तर मुद्दा :- महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत पालघर व नाशिक जिल्हयातील आदिवासी पर्यटनाला चालना देण्यासाठी अमूर्त सांस्कृतिक वारसा (ICH) हा एक अभिनव व नाविन्यपूर्ण उपक्रम सुरु करण्यात आला आहे. प्रभाव :- सदर योजनेच्या माध्यमातून आदिवासी क्षेत्रातील स्थानिक कला, संस्कृती, उत्पादने, व्यवसाय इ. गोष्टींना चालना मिळून सदर समुदायास मुख्य प्रवाहात आणले जाणार आहे. | कार्यवाही पूर्ण |
| |||||||||||||||||||
| 4 | पंढरपूर येथील सभामंडप व Sky Walk-प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नियुक्ती करणे. सविस्तर मुद्दा :- सोलापूर जिल्हयातील श्री.क्षेत्र विठ्ठल-रुख्मिणी मंदिर पंढरपूर येथे यात्रा कालावधी दरम्यान तात्पुरत्या स्वरुपात उभारण्यात येणारा दर्शन मंडप आणि दर्शन रांग याकरीता कायमस्वरुपी उपाययोजना करण्याचे प्रस्तावित आहे. प्रभाव :- सोलापूर जिल्हयतील श्री.क्षेत्र विठ्ठल-रुख्मिणी मंदिर पंढरपूर येथे येणाऱ्या भाविक/ पर्यटकांना दर्शनाकरीता सोयी-सुविधा उपलब्ध होणार असल्यामुळे दर्शन विनासायास / सुलभ होणार आहे. | कार्यवाही पूर्ण |
| |||||||||||||||||||
| 5 | प्रादेशिक पर्यटन विकास योजनेसाठी (RTDS) online पोर्टल विकसित करणे. सविस्तर मुद्दा :- प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत प्रस्तावांची सादरीकरण प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने करणे. प्रभाव :- प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत सादर केल्या जाणाऱ्या प्रस्तावांच्या कार्यपद्धतीत बदल करुन सर्व प्रस्ताव ऑनलाईन माध्यमातून सादर करुन योजनेमध्ये पारदर्शकता, गतिमानता व सुलभता येणार आहे. | कार्यवाही पूर्ण |
| |||||||||||||||||||
| 6 | महा बुकींग पोर्टल विकसित करणे. सविस्तर मुद्दा :- पर्यटकांना पर्यटन स्थळी सोयी-सुविधा मिळण्याकरीता महाबुकींग पोर्टल विकसित करणे. प्रभाव :-
| कार्यवाही पूर्ण | पोर्टल विकसित करण्यात आले आले. दि.01.01.2025. सदर पोर्टलचा URL https://mahabooking.com असा आहे. | |||||||||||||||||||
| 7 | स्वदेश दर्शन 2.0- शिवसृष्टी ऐतिहासिक थीम पार्क, आंबेगाव, पुणे-निविदा प्रक्रिया अंतिम करुन कार्यारंभ आदेश निर्गमित करणे. सविस्तर मुद्दा :- स्वदेश दर्शन 2.0- शिवसृष्टी ऐतिहासिक थीम पार्क, आंबेगाव या प्रकल्पाचा टप्पा-3 विकसित करणे. प्रभाव :- शिवसृष्टी आंबेगाव हा पुणे जिल्हयातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित राज्यातील सर्वात मोठा शिवसृष्टी प्रकल्प असल्याने सदर प्रकल्पाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा समृध्द ऐतिहासिक वारसा देशी-विदेशी पर्यटकांपर्यत पोहोचणार आहे. | कार्यवाही पूर्ण |
| |||||||||||||||||||
| 8 | मालवण, सिंधुदुर्ग येथे पाण्याखालील पर्यटन विकसित करणे-INS Guldar जहाजाचे स्वच्छता कार्यक्रम पूर्ण करणे. | कार्यवाही पूर्ण | INS Guldar जहाजाचा स्वच्छता कार्यक्रम दि.21.04.2025 रोजी पूर्ण करण्यात आला. | |||||||||||||||||||
| 9 | एक खिडकी योजना -मैत्री पोर्टलशी संलग्न करणे व अधिसूचित सेवा प्रदान करणे. मुद्दा :- महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम-2005 अंतर्गत नागरिकांना पर्यटन विभागामार्फत सेवा प्रदान करणे. प्रभाव :- महाराष्ट्र पर्यटन विभागामार्फत पर्यटकांना अधिक सोयी-सुविधा उपलब्ध करुन दिल्याने शासनाची जनतेप्रती असणारी शासकीय सेवेबाबतची पारदर्शकता, जबाबदारी तसेच, उत्तरदायित्व या बाबी साध्य होणार आहेत. | कार्यवाही पूर्ण | पर्यटन विभागामार्फत नागरिकांना एकूण 14 लोकसेवा पुरविण्यात येणार असून त्याबाबत दि.29.04.2025 रोजी अधिसूचना निर्गमित करण्यात आली आहे. | |||||||||||||||||||
| 10 | शिव सृष्टी थीम पार्क, (5 ठिकाणी प्रस्तावित)-उच्च स्तरीय समिती व शिखर समितीची मान्यता प्राप्त करुन घेणे. सविस्तर मुद्दा :- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित शिवसृष्टी उभारणे. प्रभाव :- छत्रपती शिवाजी महाराज यांचे हिंदवी स्वराज्य उभारण्याकरीता असलेले योगदान, त्यांचेवर राजमाता जिजाऊ आणि छ.शहाजी राजे यांचा असलेला प्रभाव आणि संस्कार तसेच, छ.शिवाजी महाराजांचे छ.संभाजी महाराज, छ.राजाराम महाराज यांचेवर असलेले संस्कार, महाराजांची युध्दनिती, दुरदृष्टी, धुरंदर राजकारण इ. गोष्टींचा सद्याच्या पिढीवर अनुकुल प्रभाव होणार आहे. | कार्यवाही अपूर्ण | सद्यस्थिती :-
| |||||||||||||||||||
| 11 | राम काल पथ विकास, नाशिक – निविदा प्रक्रिया अंतिम करणे | कार्यवाही पूर्ण | राम काल पथ विकास, नाशिक – निविदा प्रक्रिया अंतिम करणे कार्यवाही पूर्ण नाशिक येथील राम काल पथ प्रकल्प सुरु करण्याच्या अनुषंगाने दि.23.06.2025 रोजी सदर प्रकल्पाचे कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. | |||||||||||||||||||
| 12 | प्रादेशिक पर्यटन विकास योजनेसाठी (RTDS) योजना सुव्यवस्थित करणे-शासन निर्णय निर्गमित करणे. सविस्तर मुद्दा :- राज्यातील पर्यटन स्थळांच्या ठिकाणी उच्च दर्जाच्या मूलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी प्रादेशिक पर्यटन विकास योजनेच्या (RTDS) कार्यपद्धतीत सुधारणा करणे. प्रभाव :- पर्यटन क्षेत्रात काळानुसार विकसित होणाऱ्या नाविन्यपूर्ण संकल्पना, केंद्र शासनाकडून वेळोवेळी जाहीर करण्यात येणारी मार्गदर्शक तत्त्वे तसेच, जिल्हाधिकारी / पर्यटन संचालनालय / महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्याकडून शासनास प्राप्त होणाऱ्या प्रस्तावांचे बदललेले स्वरुप, आधुनिक तंत्रज्ञान, ऑनलाईन पोर्टल, इ. च्या माध्यमातून योजनेच्या कार्यपद्धतीत पारदर्शकता आणून प्रभावी व जलद अंमलबजावणी होणार आहे. | कार्यवाही अपूर्ण | सद्यस्थिती :- पर्यटन विभाग, शासन निर्णय दि.04.11.2010 अनव्ये राबविण्यात येणाऱ्या प्रादेशिक पर्यटन विकास योजनेच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्याच्या अनुषंगाने नस्ती शासन मान्यतेस्तव दि.01/04/2025 रोजी सादर करण्यात आली असून दि.15.05.2025 रोजीपर्यंत शासन निर्णय निर्गमित करण्याचे प्रस्तावित आहे. | |||||||||||||||||||
| 13 | MICE Bureau स्थापना करणे. सविस्तर मुद्दा :- महाराष्ट्र पर्यटन धोरण-2024 अंतर्गत राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे मोठे कार्यक्रम राज्यात आयोजित करण्यासाठी MICE Bureau स्थापन करणे. प्रभाव :- सदर कार्यक्रमांच्या आयोजनामुळे राज्यात आगामी 10 वर्षात रु.1 लक्ष कोटी इतकी खाजगी गुंतवणूक तसेच, प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष 18 लक्ष नवीन रोजगार निर्मिती होणार आहे. | कार्यवाही अपूर्ण | सद्यस्थिती :-
|
************


